“अंगणवाडी माझ्या घरी ” भाग 1

वर्ष 2020 मध्ये घडलेली अभूतपूर्व घटना म्हणजे कोविड 19 या रोगाची जागतिक साथ. या साथीमुळे देशातील बहुतांश शाळा आणि अंगणवाड्या जवळ जवळ गेले वर्षभर बंद आहेत. पाचवी ते दहावीच्या शाळा काही प्रमाणात उघडल्या असल्या तरी अंगणवाड्या मात्र अजूनही बंदच आहेत. या शाळाबंदीचा मुलांच्या आयुष्यावर आणि शिकण्यावर नेमका काय परिणाम झाला आहे याचा अदमास अजून पूर्णपणे कोणालाच आलेला नाही. पण या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे या साठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचे अनेक प्रयत्न  शासकीय आणि अशासकीय पातळीवर सुरू झाले आहेत. अशाच एका प्रयत्नाचा हा धांडोळा.

पालवी हा क्वेस्टचा कार्यक्रम  जवळ जवळ 1800 अंगणवाड्यांपर्यंत पोहचला आहे. अंगणवाडी सुपरवायजर आणि सेविकांसोबत काम करून अंगणवाड्यांतील बालशिक्षणाची सेवा मजबूत करणे, असे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. लॉकडाऊन नंतर हे काम जे ठप्प झाले ते अजून सुरू झालेले नाही आणि म्हणूनच अंगणवाडी बाहेर मुलांचे शिक्षण कसे चालू ठेवता येईल याचा विचार सुरू झाला.

अंगणवाडीच्या मुलांचा वयोगट लक्षात घेता त्यांच्या हातात मोबाईल किंवा तत्सम उपकरणे देऊन शिकवणे हे फारसे योग्य नाही. कारण एकतर इतक्या लहान वयात मुलांच्या हातात स्क्रीन दिल्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे अजून पूर्णपणे उमजलेले नाही. दुसरे म्हणजे स्क्रीन वर तयार केलेले शैक्षणिक अनुभव हे फारच मर्यादित असतात. खऱ्याखुऱ्या वस्तू वापरून मोठ्या माणसांच्या मदतीने घेतलेला अनुभव  मुलांसाठी जास्त फायद्याचा आहे. याचा विचार करता पालकांच्या मदतीने मुलांचे शिक्षण घरीच सुरू कसे ठेवता येईल या दिशेने काम करण्याचा निर्णय झाला. काही दिवस विचार विमर्श झाल्यावर, आवश्यक ती आकडेवारी गोळा करून पुढील योजना तयार झाली.

  1. घरच्या घरी  मुलांना कसे शिकवावे हे समजावून देणारे काही व्हिडिओ तयार करायचे आणि ते मुलांच्या पालकांपर्यंत पोहचवायचे. 
  2. अंगणवाडी ताईंनी ज्या पालकांकडे स्मार्ट फोन आहे अशा पालकांचे  whatsapp गट तयार करायचे आणि या गटात व्हिडिओ पोस्ट करायचे. व्हिडिओ सोबत गरजेचे असल्यास काही सूचना लिहून पाठवायच्या. आणि पालकांना व्हिडिओ पाहून मुलांसोबत काम  करण्याचे आवाहन करायचे.
  3. ज्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत असे पालक अंगणवाडीत आहार घ्यायला येतील तेव्हा त्यांना अंगणवाडी ताईने व्हिडिओ दाखवायचा आणि मुलांसोबत कृती करण्याचे आवाहन करायचे.

गेल्या काही महिन्यात पालघर, परभणी, अमरावती, यवतमाळ या चार जिल्ह्यांत मिळून पालकांचे 87 गट तयार झाले आहेत आणि त्यात 1541 पालक सहभागी आहेत. बऱ्याच पालकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. काही पालकांनी आपण मुलाला कसे शिकवले याचा व्हिडिओ करून परत गटावर टाकायला ही सुरुवात केली आहे. काही प्रमाणात का होईना मुलांचे शिक्षण घरच्या घरी सुरू झाले आहे.

एकास एक संगती या कल्पनेवर क्वेस्टने पाठवलेलेला व्हिडिओ –

मुलांच्या पालकांनी पाठवलेला व्हिडिओ प्रतिसाद

या व्हिडिओतील रुद्रला ‘काय जास्त काय कमी’ हे कसे ओळखायचे याचा बऱ्यापैकी अंदाज आला आहे. पण ‘कपांपेक्षा प्लेट जास्त’ हे तुलना दाखवणारे विधान करायला अजून जमत नाहीये. म्हणूनच काय जास्त आहे या प्रश्नाचे उत्तर त्याने बरोबर दिले आहे. पण तुलनेचे विधान करताना मात्र ‘कप जास्त, प्लेट जास्त’ असे केले आहे. एखादी बाब मुलाला समजलेली असली तरी ती नेमक्या भाषेत मांडणे मुलांना बऱ्याचदा जमत नाही. अशावेळी थोडीशी मदत मिळाली तर मुले सहज पुढे जातात. त्यातून त्यांच्या भाषा विकासाला चालना मिळते. अंगणवाडीतील गणिताचे शिक्षण भाषेच्या विकासाशी असे घट्ट जोडलेले आहे. म्हणूनच भाषेची मदत देणारा मोठा माणूस मुलांच्या आसपास हवा. मोबाईल किंवा तत्सम यंत्रे अशी मदत करू शकत नाहीत आणि म्हणूनच पालकांनी या बाबत पुढाकार घ्यायला हवा. दिवसांतून पंधरा मिनिटे जरी असे काम मुलांसोबत केले तरी त्याचा खूप फायदा होईल.  

मुलांच्या पालकांनी असे व्हिडिओ पाठवायला सुरुवात केल्यावर अंगणवाडी ताईंचा उत्साहही वाढला आहे. अंगणवाडी माझ्या घरी या उपक्रमामुळे पालक या शब्दाची व्याख्या ही आम्हाला बरीच विस्तृत करावी लागली आहे. कारण हे व्हिडिओ पाहून मुलांचे आईवडीलच नाहीत तर मोठे भाऊ-बहीण, आजी आजोबा कधी कधी शेजारच्या घरातील शिकलेली ताई सुद्धा मुलांच्या शिक्षणात सहभाग नोंदवू लागली आहेत. एकंदरीत येत्या काळात ‘अंगणवाडी माझ्या घरी’ हा क्वेस्टच्या पालवी कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होईल असे दिसते.

43 thoughts on ““अंगणवाडी माझ्या घरी ” भाग 1

Add yours

  1. खुपच छान कल्पना आहे सर तुमची.रआम्ही पण या लॉकडाऊनच्या काळात असेच उपक्रम मुलांना घरी करण्या साठी पाठवत होतो.पालकांचा उत्तम प्रतिसात मिळाला.

  2. खरंय. प्रत्येक पालकाला आपल मूल शिकल पाहिजे,त्यात आपला सहभाग हवा ही मनस्वी इच्छा असतेच. खूप उपयुक्त काम आहे निलेश दादा हे क्वेस्ट संस्थेच.

    1. श्री राजन गोपाळ कुलकर्णी शिरगांव तालुका वाई, सातारा says:

      लहान मुलांना कृती मधून शिक्षण देणेची पद्धत खूप प्रभावी व सोपी आहे.

      1. खूप छान.. अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे यात.

  3. Parents are the first educator for the child. Proper guidance given to parents in this post-pandemic is incredible! Now when still schools are not open for children, this Whatsapp Group guidance would keep the cognitive development of children in the process with such activities.
    The activities are done with the things which are home itself. Sharing learning experiences through videos will inspire others!
    Great ideas for parents to get more involved and understand things from the educator’s perspective.

  4. आंगंनवाडी बंद असताना मुलांच्या शिक्षणाचा प्रयत्न करणे ही चागलीच सुरुवात आहे. छान उपक्रम. पण लेख खूप लहान पेक्षा पूर्ण नाही वाटत. अजून कांहीं लिहायला हवे होते असे वाटते. असो.
    परभणीत कुठे कोणासोबत काम करता?

    1. सूर्यकांत काका तुमचा फीडबॅक पुढचे ब्लॉग लिहिताना नक्की लक्षात ठेवतो. ब्लॉग फारसा लांब नसावा असे बंधन घालून घेतल्याने जरा कसरत करावी लागत आहे.
      परभणी मधील पाथरी आणि मानवत या दोन तालुक्यांतील अंगणवाड्ययांत काम चालू आहे.

  5. What an excellent and much needed initiative by QUEST under its Palavi programme! Involvement of parents in children’s activities (esp in under-resourced regions) needs a big push to maintain continuity in formal learning during the lockdown. This guided initiative enables parents to play their role in a doable and participatory way. This initiative can be scalable with support from QUEST across the state (and even in India).

    1. खूप चांगला प्रयत्न आहे सर. खरं म्हणजे कोरोना महामारीने मुलांच्या शिक्षणात पालकांची किती महत्वाची भूमिका आहे हे अधोरेखित केलंय. पालक म्हणून आम्ही मुलांचं शिक्षण केवळ शाळेवर सोडणं हे अशा संकटाच्या काळात किती फोल ठरलं हे जाणवलं. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग असणं किती आवश्यक आहे हे जाणवतं. आपण पालकांसोबत सुरु केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे. कोरोनाच्या संकटाने किती वेगवेगळी क्षेत्रं प्रभावित झालीत हे आपल्या लेखमालेतून दिसतं. बालशिक्षणात आपण करत असलेलं काम, तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षणातील नवनवे प्रयोग हे दुर्गम – आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या परिघात ठेवण्यासाठीचं महत्वाचं काम आहे. पुढचे लेख वाचायला नक्की आवडेल. खरं म्हणजे कोरोना काळातील तुमच्या – क्वेस्टच्या कामाचं डॉक्युमेंटेशन होणं आवश्यक आहे. जे पुढच्या काळात मार्गदर्शक ठरेल.

      1. या व्हिडिओ मुळे आपणासर्वाना मदत होते आहे हे वाचून क्वेस्टच्या टीमचा उत्साह नक्कीच वाढेल. या निमत्ताने आपण बालशिक्षणासारख्या दुर्लक्षित विषयावर समाजात काही विचार मंथन सुरू करू शकलो तरी खूप काही साध्य होऊ शकेल.

  6. एकास एक संगती हा भाग शिकण्याच्या प्रत्येक टप्यावर उपयोगी ठरत असतो. आंगणवाडीच्या वयात असे सराव पुरेसे आणि शास्त्रीय पणे होणे खूप गरजेचे असते. क्वेस्ट आणि निलेश दादा यांच्या कडून नेहमीच शिकण्याच्या प्रक्रियेचे नवनवीन गमक कळत असते. पुढील कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.💐

  7. फारच छान कल्पना आणि त्याचे प्रत्यक्ष execution!!पालकांचा सहभाग हा मोठा positive मुद्दा आहे.
    तुमच्या नवनवीन प्रयोगांना शुभेच्छा 🙏🙏

    1. खूपच छान. नेमके काय घ्यायचे , कसे घ्यायचे हे अत्यंत सोप्या शब्दात व दृकश्राव्य माध्यमातून समजत आहे.

  8. हे फार interesting आहे… गणित शिकतांना भाषेचं महत्व मुलांच्याही न कळत त्यांना शिकवणे हे खूप महत्त्वाचं आहे… Functional understanding is not Important !

    1. खूपच छान उपक्रम आहे. परिवर्तन ही काळाची गरज आहे. अंगणवाडी शिक्षण हा पाया आहे.यावरूनच संपूर्ण विद्यार्थी ची घडण अवलंबून असते.

  9. कल्पना आणि ती प्रत्यक्षात आणणं दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. इथे तर पालकांचाही सहभाग मिळतो आहे. हे चांगल आहे.

    1. क्वेस्टचे उपक्रम नेहमीच नावीन्यपूर्ण असतात. सहज , सोप्या आणि रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर करुन कसे शिक्षण देता येईल याचे उत्तम उदाहरण .
      . सिंधुदूर्ग जिल्ह्यात क्वेस्ट अंतर्गत काही उपक्रम राबवले जात असतील तर जरुर कळवा.
      धन्यवाद आणि आपण करत असलेल्या कार्यासाठी खूप शुभेच्छा

  10. खूप छान.मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला एक नविन दिशा मिळते..

  11. खूपच छान काम. मूल शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर त्याचं शिक्षण थांबू नये म्हणून केवळ शाळाच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य कशी सहज मदत करू शकतो याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
    शिवाय या प्रकारच्या देवाणघेवाणीत कोणताही ताण, अमुक एक सुविधा हवीच म्हणून होणार खर्चही होत नाहीये.
    पालकांनी पाठवलेले व्हिडिओ पण बोलके आहेत.
    स्तुत्य उपक्रम!!
    पुढचा भाग वाचायला नक्कीच आवडेल.

  12. निलेश दादा🙏
    मुलांचं असं घरी सुद्धा शिकणं चालू राहिलं आणि पालकांनी त्या साठी असे प्रयत्न केले तर मुलांचं शिकणं सोपं होऊन जाईल . तुमचे नवनवीन प्रयोग वाचायला नक्की आवडेल .

  13. हा उपक्रम मुलांच्या विकासासाठी जितका महत्वाचा आहे तितकाचा पालंकांसाठीही आहे. ‘मी माझ्या मुलांसोबत Video मध्ये दाखवल्यासारखी Activity केली आणि माझ्या मुलालाही ते करता आलं जे व्हिडिओतील मुलाने केलं.’ ही भावना पालकांना खूप सुखावून जाते. आपणही आपल्या मुलाला शिकवू शकतो ही नवी उम्मेद त्यांच्या डोळ्यांत दिसते. मुलाच्या विकासांच्या या टप्प्यात त्यांच्यासोबत काय कृती करायला हव्यात हे थोड्याफार प्रमाणात माहीत असलेली मी, मीही जेव्हा माझ्या मुलांसोबत या कृती करते आणि माझा मुलगा अपेक्षित प्रतिसाद देतो तेव्हा खूप आनंद होतो. मग गावांमधील या पालंकांचा आनंद तर आपण समजूच शकतो.
    या प्रयत्नांसाठी, एक पालक म्हणून क्वेस्ट टिमला खूप धन्यवाद,

  14. खूपच स्तुत्य उपक्रम. विडीओ खूप प्रभावी, व्यावहारीक आणि परिणामकारक आहेत. लेख मुद्देसूद आणि मोजक्या शब्दात मांडला आहे. पुढच्या लेखाची उत्कंठा वाढली आहे. खूप शुभेच्छा.

  15. पालकामधे बालशिक्षणाबददल योग्य दृष्टिकोन तयार होईल, पालक व मुखयसेविका यांच्या योग्य सहकार्याने सेविकेचे काम सोपे होईल, टिकेल

  16. निलेश सर,
    आपण करत असलेले काम आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे. सध्या 3 ते 6 वर्ष वयाच्या मुलांबरोबर काम करणं खुपच अवघड होऊन बसले होते. परंतु तुमचा प्रवास तुम्ही लिहायला सुरुवात केल्यामुळे मलाही 1 लीच्या मुलांबरोबर काम करणं सोपं होईल अशी आशा आहे,त्यासाठी नेहमीप्रमाणे तुमच्या व्हिडीओ चा आधार मिळत राहील. QUST मुळे शिक्षक म्हणून काय काम करायचं असत हे आता चांगलं उमजू लागला आहे आणि समजुही लागलं आहे. नेहमी तुमच्या मार्गदर्शनाच्या अपेक्षेत
    – आपलाच अभिजित काटकर

  17. चांगला प्रयत्न केले जात आहे. त्याला उत्साहवर्धक प्रतिसादही मिळत आहे.
    बालवाडीला खऱ्या अर्थाने शिक्षणवाडी बनवण्याचे कार्य केले जात आहे.

  18. बालशिक्षणाबद्दल इतकं मूलभूत काम करणं हेच मुळात खूप inspiring आहे. आणि त्यात सुद्धा राज्यातील अगदी छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या पालकांपर्यंत जेव्हा अशा प्रकारे कार्यक्रम पोचवला जातो, तो कार्यक्रम समजून घेऊन घरातील इतकी वेगवेगळी माणसं त्यात सहभागी होतात आणि त्या घरातल्या चिमुकल्यांना या कृती करायला मदत करतात हे चित्र खरंच खूप सकारात्मक वाटतं! पालकांकडून आलेले विडिओ पाहायला खूप आवडतील! पुढील blog ची वाट पाहत आहोत!

  19. निलेश दादा
    ‘अंगणवाडी माझ्या घरी’ हा क्वेस्ट चा अतिशय स्तुत्य व अचानक ओढवलेल्या या कोविडच्या असामान्य परिस्थितीवर मात करू पाहाणारा उपक्रम आहे. आपण दिलेला मार्गदर्शक व्हिडिओ हा पालकांसाठी मार्गदर्शक तर आहेच. परंतू याच्याच आधारे पालकांना अधिकचे अध्ययन अनुभव तयार करण्यास देखील या व्हिडिओ ची मदत नक्कीच होईल.
    घरा झोपतील बालकांच्या विकासासाठी सुरू असलेल्या क्वेस्टच्या प्रयत्नांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.
    जितेंद्रसिंग पाटील, धुळे

  20. अंगणवाडी माझ्या घरी हा उपक्रम खूपचं छान आहे या उपक्रमात सहभागी मानवतच्या अंगणवाडी सेविकाने घराघरात हा उपक्रम पोहोचविला यासाठी पालकांनी खुप मदत केली आम्ही जेव्हा जेव्हा व्हीडीओ पाठवतो तात्काळ पालक तो पाहतात आणि आपल्या मुलांना कृती शिकवतात व ति करून घेतात काही आई तर खुपचं आनंदी आहेत कारण त्या जेव्हा मुलासोबत कृती करतात त्यावेळेस त्याना अनुभव आला आपल मुलं किती छान शिकत आहे या उपक्रम मुळे धन्यवाद निलेश निमकर सर हि कल्पना आपनास सुचली आणि आपण ती साकारही केली.

    गाव : कोल्हा, ता.मानवत ,जि.परभणी

  21. “अंगणवाडी माझ्या घरी”हा उपक्रम राबविण्याची कल्पनाच खूप छान आहे.त्यामुळे पालकांनाही समजल की मुलांना शिकवण्यासाठी काही विशेष वेगळं करावं लागत नाही तर अगदी सहज घरातील वस्तू वापरून सुध्दा आपली मुल आपल्या मदतीने बरेच काही शिकतात.म्हणून अंगणवाडीतील बालशिक्षणाची सेवा मजबूत करण्याचे जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू.
    धन्यवाद सर.

    1. गाव:दापोरी खुर्द ता.तिवसा जि.अमरावती

  22. नमस्कार सर,. ‌‌‌
    “अंगणवाडी माझ्या घरी” हा उपक्रम खूप चांगला आहे.मोबाईल किंवा तत्सम यंत्रणा याद्वारे लहान मुलांना शिकवणे योग्य नाही. या उपक्रमांद्वारे व्हिडिओ पाहून पालक जर आपल्या मुलांना दिवसातून १५ मिनिटे वेळ देत असतील तर त्यांचा नक्कीच मुलांना फायदा होईल . आणि घरी राहूनच मुलांना शिक्षण मिळेल.म्हणूनच “अंगणवाडी माझ्या घरी”हा उपक्रम आपण पुर्णपणे राबवू .

  23. “अंगणवाड़ी माझ्या घरी” उपक्रम प्रेरणादायक आहे. या निमित्ताने मुले बालशिक्षणाशी जोडली राहतील. शक्य झ्याल्यास वडील, मोठे भावंड किंवा आजी आजोबा उपक्रम घेत असल्याचे व्हिडिओ दया. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल.

  24. Babita kunjilal rathod
    02/march/2021
    गाव.भिवापूर, ता.तिवसा,जि. अमरावती
    नमस्कार सर,
    “अंगणवाडी माझ्या घरी”हा उपक्रम खूपच छान आहे.
    या उपक्रमाचा माध्यमातून पालकांच्या मदतीने लहान मुलांना घरच्या घरी शिकवणे मुलांसाठी कमीतकमी दहा ते वीस मिनिटांचा वेळ देऊन मुले आनंदाने शिकू शकतात.शिक्षणाच्या दृष्टिकोनातून थोडेफार कृती करून घेतले तरी मुलांचा नक्कीच फायदा होईल. म्हणून अंगणवाडीतील आनंददायी बाल शिक्षण सेवा
    मजबूत करण्यसाठी हा उपक्रम आपण पूर्णपणे राबवुया.
    धन्यवाद.

  25. निर्मला बोबडे, इटाळी, मानवत,परभणी says:

    अंगणवाडी माझ्या घरी हा उपक्रम खूप चांगला सूरु आहे. परंतु हा उपक्रम राबविताना मला बऱ्याच अडचणी आल्या. माझ्या अंगणवाडीत स्थलांतर बालकांची संख्या आहे व गावात जी बालके आहेत त्यांच्या पालकांकडे व्हॉटस् अप मोबाईल नाहीत. त्यामुळे बऱ्याच पालकांना पाठवलेले व्हिडीओ पाहणे शक्य नव्हते. मुलांना कृती करुन दाखवणे अवघड होते. त्यातच कोरोनाच्या साथीमुळे गृहभेटी पण शक्य नव्हत्या. घरी गृहभेटीला गेले तर पालक सहकार्यही करत नव्हते. परंतु तरीही मी वारंवार गृहभेटी देऊन पालकांना ह्या उपक्रमाचे महत्व समजावून सांगितले व हळूहळू पालकांच्या भावना बदलत गेल्या व त्यांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.
    आज बरेच पालक मुलांकडून कृती करुन घेताना दिसतात. काही महिला पालक ह्या उपक्रमामुळे खूपच उत्साही आहेत. त्या म्हणतात, आम्हाला आमच्या मुलांकडून त्या कृती करुन घेताना आम्हालाही चांगले वाटते व मुलेही हसत खेळत दडपण न घेता कृती करतात.
    त्यामुळे सर्व क्वेस्ट टिम व निलेश निमकर सर आणि मीना निमकर मॅडम यांचे खूप खूप आभार. ज्यांनी आमच्या पर्यंत हा उपक्रम पोहोचवला व गावात घराघरात पोहोचण्यासाठी मदत केली.
    धन्यवाद

    1. निर्मला ताई तुमच्यासारख्या अंगणवाडी सेविकांच्या पुढाकारामुळे आणि मेहनतीमुळेच हा कार्यक्रम अस्तित्त्वात आला आहे आणि वाढतो आहे. आपण सर्वांनी मिळून बालशिक्षणाच्या कामाचं महत्त्व पालकांना पटवून देण्याचा प्रयत्न करू या. पालकांपर्यंत पोहचण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना मनापासूून दाद द्यावीशी वाटते.

  26. उषा भारती, मांडेवडगाव, मानवत, परभणी says:

    प्रति,
    नीलेश निमकर,
    सप्रेम नमस्कार
    अंगणवाडी माझ्या घरी हा उपक्रम खूप छान आहे. पालक ग्रूप बनवण्यासाठी जेव्हा पालकांकडे मोबाईल नंबर मागायला जात होते तेव्हा पालक नकार देत होते. कोणी कोणी तर बंद मोबाईल नंबर देत होते. ज्या लोकांनी स्मार्ट फोनचे नंबर दिले त्यांना गटात घेतले. मग जेव्हा आपल्या पाठांचे व्हिडीओ पाठवले तेव्हा बाकीच्यांना वाटले की आपण चुकलो आपल्याकडेपण असेच व्हिडीओ आले असते आणि आपल्या बालकांना आपण शिकवले असते. त्यानंतर मग सर्व पालकांनी पटापट व्हॉटस् अपचे नंबर दिले व गटात अॅड करायला सांगितले.
    जेव्हा वर्कशीट द्यायला सुरुवात केली तेव्हा काही पालकांना वेळ नसायचा. ते म्हणायचे आता केव्हा शिकवायचं? मग मी आजूबाजूच्या चार ते पाच महिला गोळा करून एका ठिकाणी पालक भेट घेतली. व्हिडीओ दाखवून त्या कृती करुन दाखवल्या. असे त्यांच्या लक्षात आणून दिले.
    आता सर्व पालक व्हिडीओ बघून मुलांना आनंदाने शिकवत आहेत. त्यांना वाटते बालक किती सोप्या शब्दात व हसत खेळत शिकत आहेत. आता पालक पुढील व्हिडीओचीदेखील वाट बघत आहेत. शिक्षणाचा खरा पाया अंगणवाडीतच आहे असे पालकांचे उद्दगार ऐकू येतात आणि अंगणवाडी ताई जोमाने काम करत आहेत असे ते म्हणत आहेत.
    ह्या उपक्रमाबद्दल धन्यवाद सर

    1. उषाताई, तुम्ही करत असलेल्या प्रतत्नांची दिशा अगदी योग्य आहे. या प्रकारे मुलांच्या शिक्षणात सहभागी होणे पालकांसाठीही नवीन आहे. त्यामुळे सुरुवातीला ते चटकन सहकार्य देणार नाहीत. पण आपण थोडे प्रयत्न केले तर त्यांचा प्रतिसाद मिळवता येतो हे तुम्ही केलेल्या कामातून दिसतेच आहे. पालकांनी अंगणावाडीच्या कामाबाबात जाणून घेणे आणि अंगणवाडीच्या कार्यक्रमाला मदत करणे असे जर या उपक्रमातून घडले तर फारच चांगले होईल. तुमेच या बाबतचे अनुभव नक्की कळवत राहा.

  27. Important for all of us to continue and build on parental engagement and involvement once schools/Anganwadis reopen too.

  28. खूपच चांगला उपक्रम आहे सर. खरं तर कोरोना महामारीच्या संकटाने मुलांच्या शिक्षणात पालकांची भूमिका किती महत्वाची आहे हे अधोरेखित केलंय. पालक म्हणून आम्ही मुलांचं शिक्षण केवळ शाळेवर सोडल्यानं अशा संकटाच्या काळात मुलांच्या शिक्षणातील पालकांचा सहभाग महत्वाचा आहे हे जाणवलं. कोरोना काळात आपण केलेलं काम महत्वाचं आहे. कोरोना महामारीमुळे किती वेगवेगळी क्षेत्रं प्रभावित झालीत हे आपल्या लेखातून जाणवतं. कोरोना काळात आपण आणि क्वेस्टनं केलेलं काम हे दुर्गम – आदिवासी भागातील मुलं शिक्षणाच्या परिघात टिकण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर, नवनवे प्रयोग करत क्वेस्टनं हे आव्हान खूप चांगल्या रितीने पेललंय. ज्या एका वर्गाकडे तंत्रज्ञानाची सुविधा नाही त्यांच्यापर्यंत अंगणवाडी ताईच्या माध्यमातून पोहचण्याचा केलेला प्रयत्न महत्वाचा आहे. अन्यथा अशी वंचित वर्गातील मुलं तंत्रज्ञानाअभावी दूर राहण्याची भीती अधिक होती. पण आपण त्यावर मात करून अधिकाधिक मुलांपर्यंत पोहचण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. आपल्या कामाचे यापुढचेही लेख वाचायला आवडतील.
    खरंतर कोरोना काळात क्वेस्टने केलेल्या कामाचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे, जे पुढील काळात मार्गदर्शक ठरेल. आपल्या लेखांमधून अशा संकटाच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत ऑनलाईन शिक्षण कसं द्यायला हवं याचा वस्तुपाठ घालून दिला जाईल हे निश्चित. अन्यथा शासनाच्या अन्यथा ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा कसा उडाला हे सारे आपण जाणतोच. त्यामुळे आपले लेख पालक म्हणून आम्हाला मार्गदर्शक ठरताहेत.

  29. निमकर सर खूप छान व उपयुक्त असा उपक्रम .आहे या वयोगटातील मुलांना अशा मागॕदशॕनाची खूप गरज आहे सर्व मुलांच्याबाबतीत आपण केलेले मागॕदशॕन आम्हांला खूपच उपयुक्त व दिशा देणारे आहे .आपल्या कायाॕस मनःपूर्वक शुभेच्छा व खूप धन्यवाद .

  30. मला खूप आवडली ही संकल्पना कारण माझ्या माहितीत खूप active अंगणवाडी ताई आहेत ज्या .या संकल्पना राबवून खूप मुलांना मदत करतील Infact ही कल्पना माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे माझ्या मुलाच्या विकासासाठी Thanks a lot

  31. Anganwadi mazya dari ha upakram khup chan ahe shiklelya palkana asa upakram karane khup sahaj ani sope ahe parantu je ashikshit palak ahet tyana asa upakram karnesathi anganvadi tai hach ekmev upay ahe jithe android mobile sudha vaparane parvadat nahi asha hikani ekmev paryay ha anganvadi tai hach ahe mhanun tyana adhi prashikshit karane khup garjeche ahe ani tyana dheyvadi banavane pan titakach mahatwach ahe

  32. आदरणीय निलेश सर क्वेस्ट संस्थेशी भाषा कोर्सच्या माध्यमातून जुळायला अवघे काही महिनेच झाले आहेत. ग्यानप्रकाश फाऊंडेशन, डाएट नंदुरबार प्रामुख्याने उल्लेख करेल ते म्हणजे आमचे उदय केदार सर यांच्यामुळे ही संधी मिळाली. बावीस वर्ष शिक्षक म्हणून काम करतांना सर्वार्थाने वेगळे प्रशिक्षण मला मिळाले.
    आजही आपला हा ब्लॉगवरील लेख वाचतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मुलांच्या शिकण्याकडे आपले किती बारकाईने लक्ष असते. पालवी उपक्रम, कोरोना संकटात बंद असलेल्या अंगणवाड्या त्यातील मुलांचं शिकणं बंद होऊ नये म्हणून निवडलेला पर्याय आणि त्याला पालकांनी दिलेली साथ हे सर्वकाही शिक्षक म्हणून मला खुपचं प्रोत्साहित करणारं आहे. मुलांच्या शिकण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन यानिमित्ताने मिळाला.धन्यवाद
    प्रकाश बोरसे
    सहभागी शिक्षक भाषा कोर्स

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

Discover more from The Road Less Travelled

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading