गोष्टी किंवा कथा यांना मानवी संस्कृतीत फारच महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तिथल्या तिथल्या स्थानिक गोष्टी आपल्याला सापडतातच, इतका तो मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लहान मुलांच्या जीवनात तर गोष्टींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने या विषयाचा अभ्यास करणे फारच गरजेचे आहे. या अभ्यासाची सुरुवात आपण शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या... Continue Reading →
परिपाठातील कृती भाग 3
अंगणवाडीतील परिपाठादरम्यान नियमितपणे करता येतील अशा काही कृती आपण या आधीच्या दोन ब्लॉग पोस्टस् मध्ये पाहिल्या. यातील बऱ्याचशा कृतींमधून मुलांच्या तोंडी भाषेच्या विकासाला आणि साक्षरतेच्या विकासाला कशी चालना मिळते हेही आपण अभ्यासले. परिपाठातली आजची कृती आहे हवेच्या नोंदी आणि चित्रालेख. या कृतीत मुले हवेच्या स्थितीच्या नोंदी करतात आणि मग त्या नोंदींच्या आधारे एक चित्रालेखही तयार... Continue Reading →
परिपाठातील कृती भाग २
परिपाठ म्हणजे अंगणवाडीत रोज नेमाने करायच्या कृती हे आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिले. या ब्लॉगमध्ये आपण अशाच दोन कृतींची माहिती घेणार आहोत. पहिली कृती आहे हजेरी तक्त्यावर सही करण्याची. या कृतीचा मुख्य उद्देश असा आहे की लेखनाचा एक उपयोग मुलांच्या लक्षात आणून देणे. रोजची हजेरी नोंदवण्यासाठी अंगणवाडीत एक हजेरी तक्ता लावला जातो. या तक्त्यावर सही करून... Continue Reading →
परिपाठातील कृती भाग 1
बालशिक्षण आणि अंगणवाडी या विषयाबाबत आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्यातून एक बाब नक्कीच जाणवते, ती म्हणजे अंगणवाडी ताईचे काम लोकांना वाटते तितके सोपे नक्कीच नाही. अनेक प्रकारची व्यावसायिक कौशल्ये विकसित झाल्याशिवाय हे काम प्रभावीपणे करणे शक्य नाही. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अंगणवाडी ताईला चांगल्या दर्जाचे नियोजन कौशल्य का लागते याचा विचार करणार आहोत. गेली वीस... Continue Reading →
अंगणवाडीतले वाचनालय
मुलांना लिहायला वाचायला कधी आणि कसे शिकवायचे असा प्रश्न बरेच पालक विचारतात. जेव्हा पालक असा प्रश्न विचारत असतात तेव्हा ते बहुधा असे विचारत असतात की मुलांना लिपी कधी आणि कशी शिकवायची. आपल्याकडे वाचन-लेखन शिकणे हे लिपी शिकण्याशी घट्ट जोडले गेले आहे. लिपी शिकणे हा वाचन-लेखन शिकण्याचा महत्त्वाचा पण 'लहानसाच' भाग आहे याची जाणीव बऱ्याचदा या... Continue Reading →
व्यवस्था : नाक पुसण्याची
मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागणे हे अंगणवाडीच्या बालशिक्षण कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी अंगणवाडीत तयार केलेल्या भौतिक सुविधांची मोठीच मदत होते. अंगणवाडीतील मुलांना सर्दी होऊन त्यांचे नाक गळणे ही बाब काही नवीन नाही. दीपाताईंच्या अंगणवाडीतली मुले याला अपवाद नाहीत. सुरुवातीला दीपाताई मुलांना नाक पुसण्यासाठी एक टॉवेल द्यायच्या पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की... Continue Reading →
आनंदवाडी
देशातील 3 ते 6 वर्षे या वयोगटातील मुलांना केवळ शिक्षणच नाही तर आरोग्य, पोषण, लसीकरण अशा अनेक महत्त्वाच्या सेवा अंगणवाड्यांमार्फत पुरवल्या जातात. अंगणवाडी ताईचे काम जर नीट करायचे म्हटले तर अतिशय आव्हानात्मक असते. मध्यमवर्गात वाढणाऱ्या याच वयोगटातील मुलांचे शारीरिक आरोग्य सांभाळण्यासाठी डॉक्टर, नर्सेस असतात. त्यांचे पोषण बघण्यासाठी आहार तज्ज्ञ असतात. त्यांच्या शिक्षणाची काळजी प्रशिक्षित शिक्षक... Continue Reading →
“अंगणवाडी माझ्या घरी” भाग 2
https://youtu.be/gCHQ9-mnSAI "बाबा घरच्या घरी माझ्याशी खेळत आहेत ! जमिनीवरून सरपटताना कपडे मळतील याची चिंता न करता !!" लॉकडाऊनच्या काळात घरातल्या घरात मुलांच्या शारीरिक विकासाला चालना देण्यासाठी खेळ कसे घेता येतील याचे काही व्हिडिओ पाठवले होते. आपल्या लहानशा घरात मुलाला दोरी खालून सरपटत जायला शिकवणारे, मुलाशी प्रेमाने बोलून त्याच्या खेळात सहभागी होणारे वडील ग्रामीण भागात तरी... Continue Reading →
“अंगणवाडी माझ्या घरी ” भाग 1
कोविडच्या साथीमुळे अंगणवाड्या बंद आहेत. मात्र या काळात खेड्यापाड्यातील पालकांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत आपल्या मुलांचे शिक्षण कसे चालू ठेवले आहे त्याची ही गोष्ट.