पालक सभा

हीरा ताईने तिच्या भाषणात तिची स्वतःचीच गोष्ट सांगितली. मुलांच्या शिक्षणासाठी तिने घेतलेला भट्टीवर न जाण्याचा निर्णय अवघड कसा होता हे ही सांगितले. तसा तो घेणे सगळ्यांनाच शक्य नसले तरी मुलांच्या शाळेकडे लक्ष द्या असे कळकळीचे आवाहन केले. या साऱ्याचा काही ना काही परिणाम पालकांवर होईलच अशी आम्हाला आशा वाटते आहे.

प्रगती

या मुलांसोबत काम करताना जाणवलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना जाणवणारी संख्यानामांची अडचण. मराठी आणि बऱ्याच उत्तर भारतीय भाषांत संख्यानामे थोडी विचित्र आहेत. या मुलांना ८० नी ४ असे सांगणे सहज जमते. मात्र चौंऱ्यांशी असे संख्यानाम विचारले की गोंधळायला होते. खरे तर आपण चौऱ्यांशी ला ऐंशीचार किंवा पंचाहत्तरला सत्तरपाच अशी नावे देऊ शकतो. पण तसे संकेत मराठीत रूढ नाहीत हा प्रश्न आहे. सात हारोल्यांत ८४०० विटा आहेत हे मोजणारे राहुल आणि अमित १०० पर्यंतच्या संख्यानामांत मात्र अजून ही घोटाळे करतात.

अडथळ्यांची शर्यत

भट्टी वरच्या आमच्या वर्गात अशी अनेक बालघी राहणारी मुले त्यांच्या लहान भावंडाना कडेवर घेऊ येतात.परवा सात आठ वर्षांचा अविनाश ऐकलेल्या गोष्टीचे चित्र काढत बसला होता. त्याची आई डोक्यावर मापांची चळत आणि हातात एक दांडका घेऊन अचानक आली. तिने तारस्वरात किंचाळत त्याच्या पाठीवर दांडक्याने एक रट्टा हाणला. काय घडते आहे हे कळायच्या आत अविनाश त्याच्या भोंग्याकडे पळाला.

निष्काम कर्मयोगाची मोफत शिकवणी

माझ्या मनात एकदम निराशा दाटली. इतक्या अस्थिर वातावरणात मी आणि किशोर ने इथे येऊन शिकवण्याने काय साध्य होणार आहे? ज्या मुलांसाठी आम्ही हा खाटाटोप मांडलाय त्यांना तरी याचा काय फायदा होणार आहे? आम्ही जे करतोय ते खरंच या मुलांच्या प्रश्नांचे उत्तर आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले.

पाककुत्री !

अजून एक बाब म्हणजे आपले लेखन स्केचपेन वापरून सजवण्याची सगळ्यांना भारी हौस वाटते आहे. लिखाणा इतकाच वेळ त्यांनी या सजावटीत घालवला. 'स्केचपेन सारखे साधन मुबलकपणे वापरायला मिळणे' इतक्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीचे मुलांना वाटणारे अप्रूप पाहून माझ्या मनात समिश्र भावनांचा कल्लोळ सुरू झाला. सजावटीच्या निमित्ताने सगळे इतकावेळ एका जागी बसले याचा आनंद मानावा, की असले बारिक सारिक आनंद हीआजवर त्यांच्यापर्यंत पोहचले नाहीत याचे वाईट वाटून घ्यावे ? काही कळत नाहीये.

भाकर

मुलांना परिसरात काहीतरी अर्थपूर्ण वाचायला मिळावे म्हणून किशोरने प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्यांची नावे त्यांच्या भोंग्यावर लिहून लावायचे ठरवले. किशोर कल्पकतेने संसाधने वापरत असतो. त्याच्या शाळेत येणाऱ्या गणवेशांच्या प्लास्टिकच्या पिशव्या त्याने सांभाळून ठेवल्या होत्या. भट्टीवर काम करायचे ठरवल्यावर केलेल्या सर्वेक्षणांत सर्वांची नावे आलीच होती. मग कुटुंबातील माणसांची नावे लेऊन प्रत्येकाचा भोंगा साक्षर झाला.

राधी

राधी केवळ चुणचुणीतच नाही तर म्होरकी सुद्धा आहे. जवाबदारी घेणे तिला आवडते. काल उमेश नी देवारामची मारामारी झाली तर हिने मध्ये पडून ती सोडवली. किशोरच्या वर्गात बसलेली असताना बाकीच्या मुलांची वकिली करण्यातही ती पुढे असते. पण भट्टीवरचे अस्थिर आयुष्य तिच्यातल्या या अंगभूत गुणांना फुलवू शकेल?

शाळा तयार आहेत ?

शाळेत आल्यावर आपल्याला काही येत नाही, काही समजत नाही हीच भावना निर्माण होणार असेल तर मुलांना शाळेबद्दल गोडी का वाटावी? मतीसारख्या मुलांना अपयशच येईल अशी शाळेची रचना आपण करून ठेवली आहे का?

कॅम्पुटर

या अनुभवा नंतर आम्ही ठरवलंय की जमेल तितकं त्यांचं आयुष्य कॅमेऱ्यात कैद करयाचं आणि त्या फोटोंच्या आधारे केलेलं लिखाण त्यांना वाचायला द्यायचं. ज्यांना अजून लिपी परिचयात गोडी वाटत नाहीये त्यांना ही त्यांच्या स्वतःच्या गोष्टी लिहून दाखवायच्या. अशाप्रकारचे लिखाण वाचायला मिळाले तर या मुलांची वाचायला शिकायची गोडी वाढेल असा आमचा होरा आहे.

अकरा खरड्यात किती राख?

खरे तर राहुलला अजून पाढे येत नाहीत. पण स्वतःच्या विश्वातली समस्या समोर आली तर ती सोडवण्या इतपत संख्यांवर प्रभुत्त्व त्याने नक्कीच मिळवलंय. आता आमच्या समोर आव्हान आहे ते राहुलच्या स्वतःच्या लवचिक रीती पासून सुरुवात करून त्याला अधिक अमूर्त अशा आकडेमोडीच्या सर्वसामान्य रीती पर्यंत घेऊन जाण्याचं.

Blog at WordPress.com.

Up ↑