आनंदवाडी

देशातील 3 ते 6 वर्षे या वयोगटातील मुलांना केवळ शिक्षणच नाही तर आरोग्य, पोषण, लसीकरण अशा अनेक महत्त्वाच्या सेवा अंगणवाड्यांमार्फत पुरवल्या जातात. अंगणवाडी ताईचे काम जर नीट करायचे म्हटले तर अतिशय आव्हानात्मक असते. मध्यमवर्गात वाढणाऱ्या याच वयोगटातील मुलांचे शारीरिक आरोग्य सांभाळण्यासाठी डॉक्टर, नर्सेस असतात. त्यांचे पोषण बघण्यासाठी आहार तज्ज्ञ असतात. त्यांच्या शिक्षणाची काळजी प्रशिक्षित शिक्षक... Continue Reading →

“अंगणवाडी माझ्या घरी” भाग 2

https://youtu.be/gCHQ9-mnSAI "बाबा घरच्या घरी माझ्याशी खेळत आहेत ! जमिनीवरून सरपटताना कपडे मळतील याची चिंता न करता !!" लॉकडाऊनच्या काळात घरातल्या घरात मुलांच्या शारीरिक विकासाला चालना देण्यासाठी खेळ कसे घेता येतील याचे काही व्हिडिओ पाठवले होते. आपल्या लहानशा घरात मुलाला दोरी खालून सरपटत जायला शिकवणारे, मुलाशी प्रेमाने बोलून त्याच्या खेळात सहभागी होणारे वडील ग्रामीण भागात तरी... Continue Reading →

“अंगणवाडी माझ्या घरी ” भाग 1

कोविडच्या साथीमुळे अंगणवाड्या बंद आहेत. मात्र या काळात खेड्यापाड्यातील पालकांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत आपल्या मुलांचे शिक्षण कसे चालू ठेवले आहे त्याची ही गोष्ट.

एका गोष्टीमागची गोष्ट

२०१९च्या ऑगस्ट महिन्यात कधीतरी पालकनीतीच्या प्रियंवदा बारभाई यांचा एक मेसेज व्हॉट्सअप वर आला. या वर्षीचा पालकनीतीचा दिवाळी अंक कथा विशेषांक म्हणून प्रसिद्ध होतो आहे त्यासाठी कथा पाठवा, असें त्यांनी कळवले होते. या विशेषांकात पुढील तीन प्रकारच्या कथा पाठवता येतील असे ही त्या मेसेजमध्ये लिहिले होते . १. प्रौढांनी बालकांसाठी लिहिलेल्या कथा २. प्रौढांनी बालकांच्या भावविश्वाबाबत... Continue Reading →

मराठीतील संख्यानामे

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात दोन अंकी संख्यांच्या नामात केलेला बदल सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकवीस, बावीस या ऐवजी वीस एक, वीस दोन अशी पर्यायी संख्यानामे पाठ्यपुस्तकात सुचवली आहेत. अनेक जणांना हा बदल अजब वाटतो आहे. या संख्यानामांतील बदलामुळे मुलांना नेमके काय म्हणायला शिकवायचे या बाबत शिक्षक आणि पालक यांच्यात बराच गोंधळ उडालेला दिसतो आहे. या... Continue Reading →

पालक सभा

हीरा ताईने तिच्या भाषणात तिची स्वतःचीच गोष्ट सांगितली. मुलांच्या शिक्षणासाठी तिने घेतलेला भट्टीवर न जाण्याचा निर्णय अवघड कसा होता हे ही सांगितले. तसा तो घेणे सगळ्यांनाच शक्य नसले तरी मुलांच्या शाळेकडे लक्ष द्या असे कळकळीचे आवाहन केले. या साऱ्याचा काही ना काही परिणाम पालकांवर होईलच अशी आम्हाला आशा वाटते आहे.

आम्ही वाचतो.. लिहितो…

अश्विनीची अभिव्यक्ती प्रमाण भाषेतील नाही. तिची वाक्यरचना विस्कळीत आहे. जसे मनात विचार आले तसे ते कागदावर उतरवायचा प्रयत्न तिने केला आहे. लिखाणाचे फारसे नियोजन केले ही नाही. पण म्हणून काय झाले? आपल्या भावना लिहून दुसऱ्यापर्यंत पोहचवता येतात हे तिला नेमके उमगले आहे. सरांसाठी काहीतर करायची तिची भावना अगदी अस्सल आहे. अशावेळी तिच्या लिखाणातल्या चुका काढत बसणे अगदी करंटेपणाचे ठरेल.

Progress

We have noticed while working with these children that they face a problem with number-names. In Marathi and some North Indian languages, the number-names are a little peculiar. These children can say “80 and 4” quite easily. But they find ‘chauryanshi’ (चौंऱ्यांशी ) confusing.

Hurdle Race

There we go again. Start from scratch. Tarabai and Anutai had done this pioneering work decades ago. I feel amazed and saddened that their work is not outdated even today.

प्रगती

या मुलांसोबत काम करताना जाणवलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना जाणवणारी संख्यानामांची अडचण. मराठी आणि बऱ्याच उत्तर भारतीय भाषांत संख्यानामे थोडी विचित्र आहेत. या मुलांना ८० नी ४ असे सांगणे सहज जमते. मात्र चौंऱ्यांशी असे संख्यानाम विचारले की गोंधळायला होते. खरे तर आपण चौऱ्यांशी ला ऐंशीचार किंवा पंचाहत्तरला सत्तरपाच अशी नावे देऊ शकतो. पण तसे संकेत मराठीत रूढ नाहीत हा प्रश्न आहे. सात हारोल्यांत ८४०० विटा आहेत हे मोजणारे राहुल आणि अमित १०० पर्यंतच्या संख्यानामांत मात्र अजून ही घोटाळे करतात.

Powered by WordPress.com.

Up ↑