२०१९च्या ऑगस्ट महिन्यात कधीतरी पालकनीतीच्या प्रियंवदा बारभाई यांचा एक मेसेज व्हॉट्सअप वर आला. या वर्षीचा पालकनीतीचा दिवाळी अंक कथा विशेषांक म्हणून प्रसिद्ध होतो आहे त्यासाठी कथा पाठवा, असें त्यांनी कळवले होते. या विशेषांकात पुढील तीन प्रकारच्या कथा पाठवता येतील असे ही त्या मेसेजमध्ये लिहिले होते .
१.
प्रौढांनी बालकांसाठी लिहिलेल्या कथा
२.
प्रौढांनी बालकांच्या भावविश्वाबाबत लिहिलेल्या कथा
३. मुला
मुलींनी लिहिलेल्य कथा
लहान मुलांसाठी लिहिलेली एक कथा माझ्या हाताशी तयार होती, ती लगेच मी श्रीमती बारभाई यांना पाठवून दिली. पण ती कथा होती सचित्र पुस्तकासाठी लिहिलेली. दिवाळी अंकाच्या साच्यात तिला बसवणे जरा अवघड होऊ लागले. म्हणून नव्याने कथा लिहायचा निर्णय घेतला. काय लिहावे हे बराच काळ सुचत नव्हते. पण इतक्यात डोक्यात अनेक दिवस घोळत असलेला बऱ्याच वर्षांपूर्वीचा एक विषय आठवला. या विषयावर ‘प्रौढांनी बालकांच्या भावविश्वाबाबत लिहिलेल्या कथा’ या विभागासाठी कथा लिहिता येईल असे वाटले म्हणून लिहायाला सुरुवात केली आणि त्यातून ही गोष्ट तयार झाली. बऱ्याच वेळा उलट सुलट विचार केल्यावर कथेचे सांभाळ हे नाव निश्चित झाले आणि आता ही कथा पालकनीतीच्या २०१९ सालच्या दिवाळी अंकात प्रसिध्द झाली आहे.
या कथेत तशी दोनच मुख्य पात्रे आहेत. संजी आणि शिल्पाताई. संजी खरोखरच माझ्या शाळेतली विद्यार्थिनी होती आणि कथेतील शिल्पाताई ही खरोखरच तिच्या कोच होत्या. कथा लिहिताना त्यांची नावे बदलावीत असे एकदा मनात येऊन गेले. पण कथेच्या मुळाशी असणाऱ्या अनुभवांशी मी इतका घट्ट जोडला गेलो आहे की वेगळी नावे घेऊन लिहिणे माझे मलाच पटेना. त्यामुळे शक्य तितके खऱ्या घटनांशी प्रामाणिक राहून कथा लिहायची असे ठरवले. अर्थातच कथा म्हणून लिहिताना लागणारे स्थळ-काळाच्या तपशिलाचे स्वातंत्र्य मी घेतले आहे.
मी
आदिवासी भागात काम करायला लागल्यावर एका वेगळ्याच संस्कृतीचे दर्शन मला घडले. या
संस्कृतीतल्या दोन बाबी मला फारच भावल्या. अनाग्रह आणि असंग्रह. अमुक एका प्रकारेच जगले पाहिजे, अमुक एक
मिळालेच पाहिजे असा आग्रह फार कोणी धरत नाही.
माझ्या सारख्या समाजाच्या अतिआग्रही वर्गातून आलेल्या व्यक्तीला आदिवासींची
ही अनाग्रही वृत्ती चकित करून टाकयची. अजूनही टाकते. अनाग्रहाची ही वृत्ती अगदी
लहान-मोठ्या सगळ्यांच्यात ठायी ठायी दिसते. सुरुवातीला विचित्र वाटेल असे या
लोकांचे वागणे काही काळाने आपल्याला पटू लागते. माझे ही असेच झाले. या संस्कृतीचा
अनाग्रह शिकण्याचा प्रयत्न मी करतोय, पण आज २२ वर्षांनीही तो म्हणावासा साधत नाही.
तर अशा अनाग्रही संस्कृतीतल्या एका मुलीची ही कथा आहे. तिच्या जागी मध्यमवर्गीय मुलगी आहे अशी कल्पना केली तर बहुदा ही कथा घडणारच नाही. म्हणूनच संजीचे हे वेगळे भावविश्व कथा रूपाने सर्वांपर्यंत पोहचवावेसे वाटले. अनवट वाटच्या वाचकांना हे भाविश्व कसे वाटले हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे.
बालभारतीच्या
इयत्ता दुसरीच्या पुस्तकात दोन अंकी संख्यांच्या नामात केलेला बदल सध्या चांगलाच
चर्चेत आहे. एकवीस, बावीस या ऐवजी वीस एक, वीस दोन अशी पर्यायी संख्यानामे
पाठ्यपुस्तकात सुचवली आहेत. अनेक जणांना हा बदल अजब वाटतो आहे. या संख्यानामांतील
बदलामुळे मुलांना नेमके काय म्हणायला शिकवायचे या बाबत शिक्षक आणि पालक यांच्यात
बराच गोंधळ उडालेला दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर हा बदल का करण्यात आला आहे हे
समजून घेणे अगत्याचे ठरेल.
मराठी आणि बऱ्याचशा उत्तर भारतीय भाषांत शंभरपर्यंतच्या संख्यांच्या नावांमध्ये फारशी सुसंगती आढळत नाही. पुढील काही उदाहरणे ही विसंगती लक्षात यायला पुरेशी ठरावीत. एकक स्थानी २ असणाऱ्या या संख्यांची नावे पाहा. बावीस, बत्तीस, बेचाळीस, बहात्तर, ब्याण्णव. बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की एकक स्थानची २ ही संख्या वाचताना आपण बा, बत्, बे, ब, ब्या असे वेगवेगळे उच्चार करतो आहोत. आता जी बाब दोनाच्या बाबतीत आहे, ती इतरही संख्यांच्या बाबतीत खरी आहे हे सहजच लक्षात येईल. आपण बेचाळीस सारखी संख्या लिहिताना आधी चाळीसातील चार लिहितो आणि नंतर दोन लिहितो. मात्र तीच संख्या वाचताना आधी दोन (बे) आणि मग चाळीस असे वाचतो. अजून एक बाब म्हणजे एकक स्थानी ९ आला की आपण पुढच्या दशकाचा संदर्भ घेतो. उदाहरणार्थ शेहेचाळीस ,सत्तेचाळीस ,अठ्ठेचाळीस या पुढे येणारी संख्या मात्र नवचाळीस न राहता एकोणपन्नास होते. एकक स्थानच्या नवाचा हा नियमही नेहमीच वापरला जातो असे नाही. सत्याण्णव, अठ्ठ्यांण्णव नंतर एकोणशंभर न येता नव्याण्णव येतात!
उत्तर भारतातील भाषांत अशी विसंगती का निर्माण झाली याचे स्पष्टीकरण
प्राध्यापक मनोहर राईलकर यांनी त्यांच्या संख्यावाचन या लेखात दिले आहे. या बाबतचे त्यांचे म्हणणे त्यांच्याच शब्दांत
समजून घेणे उचित ठरेल.
“संस्कृतमध्ये संख्यावाचनाचा नियम ‘अंकानां वामतो गती’ म्हणजे ‘अंक उजवीकडून डावीकडे वाचावेत’ असा आहे. १४७ ही संख्या ‘सप्तचत्वारिशत् अधिक शतम’ अशी वाचतात. म्हणजे ‘सात चाळीस आणि एकशे’, म्हणूनच मराठीत आपण पाढे म्हणताना ‘सत्तेचाळासे’ असं म्हणत असतो. पण संख्यावाचनाचा हा नियमसुद्धा आपण, म्हणजे मराठीनं धडपणं पाळला आहे, असं दिसत नाही. पाढ्यांव्यतिरिक्त वरील संख्या आपण ‘एकशे सत्तेचाळीस’ अशीच वाचतो. याचा अर्थ, लिहिण्याचा क्रम १-४-७ तर वाचण्याचा क्रम मात्र १-७-४ असा. अधिक मोठ्या संख्यांच्या वाचनात तर हा गोंधळ आणखी प्रकर्षानं जाणवतो. उदा. ३५७४ ह्या संख्येच्या पस्तीसशे चौऱ्याहत्तर अशा वाचनातील अंकांच्या वाचनाचा क्रम ५-३-४-७ असा असल्याचं दिसून येईल. संस्कृतमधून घेतलेली ही ‘वामतो गती’ व्यवहारात आणि प्रत्यक्षात फक्त दोन अंकी संख्यांपुरतीच मर्यादित राहिली असल्याचं आढळून येते.“
संख्यावाचन, मनोहर राईलकर
राईलकर सरांनी त्यांच्या लेखात मांडलेल्या काही मुद्यांची चर्चा करणारा ग्राममंगल संस्थेने तयार केलेला हा व्हिडिओ पाहा.
इंग्रजी किंवा दक्षिण भारतीय भाषांत संख्या ज्या क्रमाने लिहिल्या जातात त्याच क्रमाने वाचल्या जातात. उदाहरणार्थ 35437 ही संख्या आपण इंग्रजीत Thirty five thousand four hundred and thirty seven अशीच वाचतो. आता या विवेचनानंतर एक बाब अगदी स्पष्ट आहे की मराठीतील संख्यानामांतील ही विसंगती लहान मुलांना संख्या शिकताना अडचणीची ठरू शकते. या बाबतचा माझा अनुभव असा की बहुसंख्य मुले संख्यानामांत अशी विसंगती असली तरी त्यावर थोड्याफार प्रयत्नाने प्रभुत्त्व मिळवतातच. मात्र ज्या मुलांची घरची भाषा शाळेच्या भाषेपेक्षा ( प्रमाण मराठीपेक्षा ) वेगळी आहे अशा आदिवासी मुलांसाठी संख्यानामांची ही अडचण फारच मोठी ठरते. विशेषतः ज्या घरांतील पहिलीच पिढी शाळेत आली आहे किंवा ज्या घरांत पाठांतराची परंपरा नाही अशा मुलांना शंभर पर्यंतच्या संख्यांवर प्रभुत्त्व मिळवण्यासाठी फारच कष्ट करावे लागतात. अशावेळी ही मुले सामान्यपणे वर्गात मागे पडतात. माझ्या मते गणिताची भीती किंवा नावड निर्माण होण्याचे हे एकमेव नसले तरी एक महत्त्वाचे कारण आहे. गेले काही महिने मी वीटभट्टीवर स्थालांतरित झालेल्या मुलांना गणित शिकवत आहे. या मुलांना ८० नी ४ विटा हे सहज समजते मात्र चौऱ्यांशी असे संख्या नाम सांगितले की ती गोंधळतात. मुलांच्या या अडचणी बाबत अनवट वाट वरील प्रगती या लेखात सविस्तर वाचायला मिळेल.
मराठी व काही उत्तर भारतीय भाषांत असणारी संख्या
नामांची विसंगती आणि त्यामुळे मुलांना संख्या शिकताना येणाऱ्या अडचणी हेच
बालभारतीतील संख्यावाचनाची पद्धत बदलण्यामागचे कारण आहे. अर्थातच गणितातील अत्यंत
पायाभूत अशा संकेतांमध्ये केलेल्या या बदलाचे परिणाम दूरगामी आहेत. दोन अंकी
संख्यानामे नवीन संकेतांनुसार वापरायची झाली तर मोठ्या संख्या वाचताना त्या कशा
वाचाव्यात याचे संकेतही निश्चित करावे लागतील. उदाहरणार्थ पस्तीस हजार सातशे
बेचाळीस (३५७४२) ही संख्या तीस पाच
हजार सातशे चाळीस नी दोन अशी वाचावी लागेल. या प्रकारे सांगितलेली संख्या समजून
घेताना जुन्या संकेतांचा वापर करणाऱ्या अनेकांना फारच बिचकायला होईल. मात्र मुले
लहानपणापासून नव्या संकेतांप्रमाणे वाचन शिकत असतील तर त्यांचे फारसे काही अडणार
नाही.
मात्र अशाप्रकारचा बदल केवळ पाठ्यपुस्तकांत येणे
पुरेसे नाही. कारण पाठ्यपुस्तकांचा संबंध केवळ शाळा, मुले आणि शिक्षक यांच्याशी
आहे. त्या पलिकडील मराठीतून चालणारा गणित व्यवहार हा सामाजिक स्वरूपाचा आहे. नव्या
संकेतांनुसार शिकणाऱ्या मुलाने दुकानात गेल्यावर ‘तीस सात किलो तांदूळ द्या’
अशी मागणी केली किंवा कंडक्टरला ‘दोन तिकिटांचे दोनशे तीस नी आठ झाले ना? असा प्रश्न आज विचारला तर गोंधळ माजेल. कारण
जुनी संख्यानामे समजून घ्यायला आपण इतके सरावलो आहोत की ती आपल्याला मुद्दाम विचार
करून समजून घ्यावी लागत नाहीत. नवे संकेत मात्र आपल्याला पदोपदी विचार करायला भाग
पाडणार आणि त्याचा आपल्याला त्रास होणार.
संकेतांतील हा बदल एखाद दोन नाही तर कोट्यावधी
व्यक्तींनी स्वीकारायला लागेल. अशाप्रकारचे बदल करणे ही केवळ शैक्षणिक बाब नसून तो
एक सामजिक आणि राजकीय निर्णय ही आहे. म्हणून या प्रकारचा बदल करण्याची गरज
समाजातील बहुतेकांना पटल्याशिवाय तो प्रत्यक्ष व्यवहारात येणे अवघड आहे.
भारताने लांबीचे फूट हे एकक सोडून मीटर हे
प्रमाणित एकक स्वीकारल्याला अनेक वर्षे झाली तरीही जाहिरातीतील फ्लॅटचे दर आपल्याला प्रती चौरसफूटच दिलेले
दिसतात. कारण जनमानसांत चौरसफूट या एककाचा एक ढोबळ अंदाज आहे. जाहिरातदाराने जरी
स्पष्टपणे चौरस मीटरचा दर दिला तरी तो
चौरसफुटाचा आहे असा समज होऊन, ग्राहकाला तो जास्त वाटण्याची शक्यता आहे. म्हणून
चौरस मीटरचा दर देण्याचा धोका कोणीही जाहिरातदार पत्करत नाही.
गणिताच्या संकेतांतील असे बदल शालेय अभ्यासक्रमात या आधी झालेलेच नाहीत असे नाही. एक पंचमांश या प्रकारचे व्यवहारी अपूर्णांकांचे वाचन बदलून ते एक छेद पाच किंवा एक अंश छेद पाच असे करावे हा बदल गेल्या काही वर्षांत केला गेला आहे. मात्र एकूणच
व्यवहारी अपूर्णांकांचा वापर कमी होत असल्याने ( दशांश अपूर्णांकांच्या तुलनेत)
त्या बाबत फार गदारोळ झालेला दिसत नाही. मात्र आता रोजच्या वापरातील १००
पर्यंतच्या संख्यांच्या नावात बदल करायचा म्हटल्यावर त्याला विरोध होणे साहजिकच
आहे.
आता प्रश्न उरतो तो हा बदल करावा की नाही याचा. जर
प्रत्येक मुलाला गणित यायला हवे अशी आपली इच्छा असेल तर या बदलाचे स्वागत करावे
लागेल. कारण त्यामुळे पाठांतराची परंपरा नसलेल्या घरांतील मुलांना गणिताशी जमवून
घेणे थोडे सुलभ होईल. मात्र हा बदल केवळ एका पाठ्यपुस्तकांत येणे पुरेसे नाही.
यानंतर येणाऱ्या प्रत्येक पाठ्यपुस्तकाने तो विचार उचलून धरावा लागेल व नेटाने
पुढे न्यावा लागेल.
नवे संकेत स्वीकारताना समाजातील जवळ जवळ प्रत्येक
व्यक्तीला आपल्या आयुष्यात बदल करावा लागेल. नवे संकेत एखाद्या महिन्यात किंवा
वर्षात समाजात रुळणार नाहीत त्यासाठी सांधेबदलाच्या काळात जुनी व नवी अशा दोन्ही
संकेतव्यवस्था सुरू ठेवाव्या लागतील. नवे संकेत शिकणाऱ्या मुलांना काही काळतरी
दोन्ही संकेतप्रणालींशी जमवून घ्यावे
लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बदल टिकाऊ स्वरूपात होण्यासाठी समाजातील सर्वच
व्यवस्थांना ते स्वीकारावे लागतील. उदाहरणार्थ शासनातील विविध विभागांत नवे संकेत
कसे व कधी लागू करायचे याचा आराखडा तयार करावा लागेल किंवा आर्थिक क्षेत्रात
बॅँकांनी चेकवर नव्या संकेतांनुसार लिहिलेली अक्षरी रक्कम मान्य करावी लागेल.
बालभारतीने मुलांना केंद्रस्थानी ठेवून हा बदल करण्याचे धाडस दाखवले आहे. मात्र हे
बदल टिकण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असणे अत्यंत गरजेचे आहे.
मुलांची अनियमित उपस्थिती ही आमच्या वीटभट्टीवरील वर्गाची मोठीच समस्या आहे. मुले न येण्याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे पालकांना आमच्या या वर्गाचे महत्त्व न वाटणे. चार-पाच तास शाळेत घालवून आल्यावर मुलांनी आता घरकामात थोडा हातभार लावावा अशी काही पालकांची इच्छा आहे, तर काहींना या सगळ्या खटाटोपातून काही घडणार आहे का, याचीच शंका वाटते. एखादे मूल भट्टीवरच्या आमच्या वर्गात मित्राशी भांडले आणि रडत त्याच्या पालकाकडे गेले तर त्याची समजूत काढून त्याला परत पाठवण्याऐवजी ‘भांडायचे असेल तर जाऊ नकोस’ असाच सल्ला मिळतो. क्वचित एखादा पालक मुलांच्या भांडणाचे कारण देत दुसऱ्या पालकाशी भांडायला येतो. मग हे सारे सावरणे कठीण होऊन बसते. एकूणच कितीही काळजी घेतली तरी आमचा वर्ग पालकांच्या कामात अधेमधे व्यत्यय आणतो असे आम्हाला सारखे जाणवते.
भट्टीवरच्या बऱ्याचशा पालकांना मुलांनी शिकण्याचे महत्त्व जाणवत असले तरी आयुष्याचा झगडा इतका तीव्र असतो की मुले शिकावीत म्हणून स्वतःहून काही प्रयत्न करणे त्यांना जमत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाला पालकांनी मदत करायला हवी ही अपेक्षा त्यांच्याकडून कशी करायची, हा आमच्यासमोरचा प्रश्न होता. किशोरने सांगितले की या पालकांपैकी कोणीच शाळेच्या पालकसभेला वगैरे येत नाही. त्यामुळे या पालकांची पालकसभा भट्टीवरच घेऊ या असे मी सुचवले. पण मग प्रश्न पडला की रोज आम्ही जे करतो आहोत ते या पालकांच्या समोरच तर घडते आहे. सभा घेऊन आम्ही वेगळे काय सांगणार आहोत? पालकसभा घ्यावी असे मला आणि किशोरला वाटत होते, पण या सभेत नेमके करायचे काय हा प्रश्न होता. शिवाय अहोरात्र चालणारे आपले काम थांबवून कोणी पालक सभेला येईल का, अशी शंका होतीच.
पालकसभेत काय करावे याचा विचार करता करता मला अचानक हीराताई आठवली. हीराताई लहानपणी भट्टीवरच वाढली. त्यावेळी तिच्या भट्टीवर भोंगाशाळा असायची. हीराताई कधी मधी त्या शाळेत जायची, तर कधी चिखलाची भांडुली बनवत खेळत राहायची. त्यामुळे तिला थोडीफार अक्षर ओळख झाली होती. लग्नानंतर ती आणि तिचा नवरा बाळू दोघेही भट्टीवर जात असत. हीराताईचा मोठा मुलगा शाळेत जाऊ लागला तेव्हा ती त्याला घरी सासऱ्यांच्या सोबत ठेवून भट्टीवर जाऊ लागली. हळूहळू तिची दुसरी मुलगीही शाळेत जाऊ लागली. आता मात्र भट्टीवर जाण्याने मुलांच्या शिकण्यात खंड पडणार हे हीराताईच्या लक्षात येऊ लागले. मग आता भट्टीवर जायचे नाही असा निर्णय हीराताई आणि बाळूने घेतला. पैसे मिळवण्यासाठी म्हणून हीराताई दारू बनवून विकू लागली. बाळू मजुरीची कामे करू लागला. अधेमधे तो आमच्या संस्थेतील बांधकामावर पाणी मारण्याचे काम करण्यासाठी येई. काही दिवसांनी बाळू आणि हीराताई आमच्याकडे नियमित कामाला येऊ लागले. त्यांची मुले संस्थेत चालणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागली. त्या मुलांचे शालेय शिक्षण आता बऱ्यापैकी मार्गी लागले आहे.
केवळ मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून भट्टीवरचे काम सोडण्यचे धाडस करणारी हीराताई जर पालकांशी बोलली तर त्याचा फायदा होईल अशी कल्पना माझ्या मनात आली. किशोरचेही तेच मत पडले. म्हणून पालक सभेत हीराताईला बोलावायचे ठरवले. तीही तयार झाली. पण तरीही पालक सभेसाठी पालक जमतील का, हा प्रश्न होताच. किशोरने सुचवले की काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम ठेवला तर पालक येण्याची शक्यता वाढेल. म्हणून मग आमच्या संस्थेत चालणाऱ्या ‘गोष्टरंग’ उपक्रमातील एक नाटुकले सादर करावे असे ठरले. मुलांना महाश्वेता देवींची ‘का का कुमारी’ ही गोष्ट आवडली होतीच; त्याच पुस्तकाचे नाट्यरूपांतर सादर करावे असे नियोजन केले. किशोर पालकसभेच्या आधीच्या दिवशी भोंग्याभोंग्यात जाऊन कार्यक्रमाची कल्पना देऊन आला. तेव्हा बऱ्याच जणांनी यायची तयारी दाखवली. मुलांनाही पालकांना घेऊन यायचे आहे अशी सूचना दिली.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गोष्टरंगचा चमू भट्टीवर पोहोचला. त्यांनी आपल्या नाटकाची तयारी सुरू केली. मुले कुतूहलाने गोळा झाली. पण पालकांच्यापैकी कोणीही फिरकले नाही. सगळे आपापल्या कामात गर्क होते. काल मुलांसोबत पाठवलेल्या निरोपाचा, किशोरने जाऊन सांगून येण्याचा फारसा फायदा झालेला दिसला नाही. मग वेशभूषा केलेला गोष्टरंगचा चमू आणि मुले यांनी भट्टीवर एक फेरी मारली. प्रत्येक कोपऱ्यात जाऊन नाटक सुरू होते आहे याची कल्पना दिली. पण तरी लोकांचा निर्णय होईना. हातचे काम टाकून या पोरखेळात जावे की न जावे असा प्रश्न त्यांना पडला असावा. शेवटी शाळेच्या भोंग्याजवळ येऊन गोष्टरंगचे गाणे सुरू केले. मुले ठेका धरून टाळ्या वाजवू लागली. गाण्याचा आवाज कानावर पडल्यावर मात्र एकेक पालक गोळा होऊ लागले. थोड्याच वेळात बहुसंख्य लोक आले, पण आल्यावर पुढे येऊन न बसता नाटक दिसेल अशा बेताने कुठे कुठे उभे राहिले. उभ्या उभ्याच सगळ्यांनी नाटक पाहिले. मग किशोर आणि हीराताई बोलायला उभे राहिले.
किशोरने हीराताईची ओळख करून दिली आणि तिने तिच्या पद्धतीने संवाद साधायला सुरुवात केली. अगदी उत्स्फूर्त अनियोजित संवाद. जे जे जसे जसे मनात येईल तसे तसे हीराताई मुद्दे मांडत होती. तिच्या बोलण्याला पालकांकडून हळूहळू प्रतिसाद मिळत होता.
पालकसभेतील हीराताईचे भाषण
हीराताईने तिच्या भाषणात तिची स्वतःचीच गोष्ट सांगितली. मुलांच्या शिक्षणासाठी तिने घेतलेला भट्टीवर न जाण्याचा निर्णय अवघड कसा होता हेही सांगितले. तसा तो घेणे सगळ्यांनाच शक्य नसले तरी ‘मुलांच्या शाळेकडे लक्ष द्या’ असे कळकळीचे आवाहन केले. या साऱ्याचा काही ना काही परिणाम पालकांवर होईलच अशी आम्हाला आशा वाटते आहे. तिच्या भाषणात तिला स्वतःला वाचायला-लिहायला शिकायची किती तीव्र इच्छा आहे हे तिने बोलून दाखवले. भाषण झाल्यावर मी तिला म्हटले, ‘तुला जर इतके वाचायला-लिहायला शिकावे वाटते, तर रोज तासभर अभ्यासाला येशील का ? मी नाहीतर संस्थेतील इतर कोणीतरी शिकवेल तुला.’ ते ऐकून हीराताई प्रसन्न हसली आणि दुसऱ्या दिवशी आठाच्या ठोक्याला वही पेन्सील घेऊन दारात हजर झाली. हीराताई ज्या चिकाटीने शिकते आहे ते पाहून मला खूपच आश्चर्य वाटते आहे
गेल्या काही दिवसात तिने भलत्याच वेगाने प्रगती केली आहे. आपण रोज ज्या व्यक्तीला भेटतो, जिच्याशी दिवसातून अनेकदा बोलतो, तिची इतकी साधी पण तीव्र इच्छा असू शकेल असे माझ्या कधी डोक्यातच आले नव्हते. पण हीराच्या निमित्ताने मी मात्र अधिक जागरुक झालो. साक्षरतेवर अहोरात्र चर्चा करणाऱ्या आमच्या संस्थेत हीरा गेली काही वर्षे वावरते आहे. पण तिला लिहायला-वाचायला शिकायची हौस आहे हे आमच्यापैकी कोणाच्याही कधी लक्षात आले नाही याची खंत वाटली. पालकसभेचा भट्टीवरच्या वर्गाला नेमका काय फायदा झाला हे अजून समजलेले नाही. पण आपण अजून बरेच संवेदनशील व्हायला हवे याची जाणीव हीराताईच्या भाषणाने मला करून दिली.
गेल्या काही दिवसांत मुलांनी वाचन-लेखनाच्या बाबतीत बरीच मजल गाठली आहे. या बाबतीत काही काम आम्ही नियोजनपूर्वक केले तर काही उत्स्फूर्तपणे. वाचायला लिहायला शिकवताना काही बाबी फार कळीच्या ठरतात. एक तर मुलांच्या हातात पुस्तके पोहचायला हवीत. दुसरे म्हणजे चांगल्या वाचनाचा नमुना मुलांच्यासमोर सतत रहायला हवा. आणि तिसरे म्हणजे मुले मोठ्याने वाचत असताना त्यांना योग्य ती मदत करायला हवी.
गेल्या काही दिवसांत मी आणि किशोरने मिळून जवळ जवळ १५ पुस्तके मुलांना वाचून दाखवली. या वाचनादरम्यान प्रत्येक पुस्तकाचे लेखक, चित्रकार, कथेतील पात्रे याबाबत भरपूर चर्चा मुलांसोबत करत होतो. खरे तर तयारी करण्याच्या निमित्ताने आम्ही एखादे पुस्तक आधी दोनदा तरी वाचलेले असायचे. पण मुलांसमोर वाचताना मात्र आम्ही जणू काही ‘प्रथमच ते पुस्तक वाचतो आहोत’ अशाप्रकारे वाचून दाखवायचो. पुस्तकात पुढे काय होईल या बाबत मुलांसोबत आम्हीही आपापले अंदाज सांगयचो. एखाद्या ठिकाणी अर्थ लावायला कठीण असा काही भाग आला तर थांबून अर्थ कसा लावला जातो हे करून दाखवायचो. यातील काही पुस्तके एखाद-दोन दिवसांत संपणारी तर काही चांगली आठवडाभर चालणारी होती.
का का असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारी महाश्वेता देवींची मोयना मुलांना फारच भावली.
महाश्वेता देवींची ‘का का कुमारी’ किंवा ‘इतवा मुंडाने लढाई जिंकली’ यासारखी पुस्तके भट्टीवरल्या मुलांना फार भावली. ऐतवारी (रविवारी) जन्माला आलेला म्हणून कथा नायकाचे नाव इतवा. यासारख्या बाबी मुलांना फारच भावल्या. मंगल्या, बुधी, गुऱ्या, शिणवारी अशी वारांवरून नावे ठेवण्याची पद्धत या मुलांच्या आई वडिलांच्या काळात अगदीच रूढ होती. या चर्चेत केवळ वारांवरूनच नाही तर महिन्यावरून चैती, सरावनी अशी नावे ठेवली जातत असे मुलांच्या लक्षात आले. याबाबत किशोरने मला त्याच्या एका आदिवासी मित्राची आठवण सांगितली. त्याचा हा मित्र डी. एड्. च्या वर्गातला. त्याचे नाव तुळश्या झिपऱ्या राठोड. डी. एड्. ला आल्यावर एका प्राध्यापिकांनी त्याचे नाव तुळशीराम झिपरू राठोड असे केले. हे बदललेले नाव कागदोपत्री आणायला त्याला बरीच उठाठेव करायला लागली. तसे बघायला गेले तर तुळश्या आणि तुळशीराम, किंवा झिपऱ्या आणि झिपरू यात असा काय फरक आहे? माझ्या मते, बोलण्याची एक लकब सर्वसामान्यांची तर दुसरी अभिजनांची. पण अभिजन सर्वसामान्यांच्या लकबीला कनिष्ठ मानतात आणि म्हणून त्यांना ती त्याज्य वाटते. किशोरच्या मित्राचे नाव बदलणाऱ्या प्राध्यापिकांनी अगदी सद्भावनेने केलेल्या या लहानशा बाबीची मुळे मात्र अभिजनांच्या उच्चगंडाशी जोडलेली आहेत असेच म्हटले पाहिजे. बहिष्कृत समाजातील मुलांसोबत काम करताना आपल्याकडूनही अशा काही चुका घडतील याची धास्ती मला सतत वाटते. चांगल्या हेतूने केलेल्या कृत्याला ही दुसरी बाजू असू शकते याची जाणीव अशावेळी सतत ठेवावी लागते. शिक्षकाचे काम नीट करायचे म्हटले, तर तारेवरच्या कसरतीसारखे आहे, हे पदोपदी जाणवते.
मुलांना वाचून दाखवण्यासोबत त्यांना स्वतःला वाचायला देणेही गरजेचे होते. ओघवते वाचता यावे यासाठी आम्ही संवाद हा लेखनप्रकार वाचायला द्यायचे ठरवले. एकतर संवादाची भाषा बोलण्याच्या भाषेला तुलनेने जवळची असते. दुसरे म्हणजे संवादात दोन जण बोलत असतील तर वाचनही दोन जणांना भूमिका घेऊन करता येते. त्यामुळे एकट्याने बसून वाचण्याच्या ताणातून मुलांची थोडी सुटका होते. मुले आलटून पालटून भूमिका घेतात आणि त्यामुळे संवादातला वेगवेगळा भाग त्यांना वाचायला मिळतो. म्हणून मी मुलांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित विषयांवर काही संवाद लिहिले. यात बोरे पिकल्यावर खायला जाणाऱ्या मुलांच्या गप्पा, पाहुण्यांनी आणलेल्या खाऊ बाबत झालेले बोलणे, वीटभट्टीवरच्या एखाद्या कामाबाबत झालेले बोलणे असे अनेक विषय होते. प्रत्येक संवादात दोन किंवा तीनच पात्रे असतील हे आम्ही कटाक्षाने पाहिले होते. संवादाची भाषा कधी मुलांच्या घरची, कधी शाळेची तर कधी संमिश्र अशी ठेवली होती.
यातील काही लहान लहान संवाद आम्ही प्रथम मुलांना ओघवते वाचून दाखवले. कधी कधी मी आणि किशोर वेगवेगळ्या भूमिका घेऊन संवाद वाचायचो तर कधी पूर्ण संवाद मी एकटाच वाचायचो. या वाचून दाखवण्यानंतर संवादात किती पात्रे आहेत, त्यांचे एकमेकांशी काय नाते असेल, संवाद कोणत्या ठिकाणी झाला असेल, त्यात नेमके कशाविषयी बोलले गेले आहे या बाबात आम्ही मुलांना प्रश्न विचारायचो. यानंतर हळूहळू मुलांना संवाद वाचून न दाखवता त्यांचे त्यांना वाचून समजून घ्यायला दिले. अर्थातच या पहिल्या वाचनाचा हेतू मजकूर समजून घेणे हा होता. मजकूर समजून घेण्यापर्यंतचा हा भाग आम्ही सर्व मुलांना एकत्र घेऊनच करायचो.
यानंतर मुलांच्या जोड्या किंवा लहान गट करून मुलांना एकेक संवाद वाचायला सांगायचो. मुले गटात किंवा जोडीने वाचायला बसली म्हणजे आम्ही आळीपाळीने गटापाशी जाऊन मुलांना मदत करायचो. मुले वाचत असताना एखाद्या ठिकाणी अडली तर आपण ते वाक्य वाचून दाखवणे, वाचताना जर वाक्य चुकीच्या जागी तोडले तर अर्थ लागायला अडचण कशी येते हे लक्षात आणून देणे अशा स्वरूपाची ही मदत होती. या सगळ्याचा सुपरिणाम हळू हळू दिसायला लागला आहे. मुले आता प्रमाणभाषेतील संवादही बऱ्यापैकी वाचू लागली आहेत.
राधी आणि चंद्रिका या दोघींनी ‘मला काय ? ताईला काय?” हा संवाद कसा वाचला ते पुढील व्हिडिओत पाहा.
मुलांना ओघवते वाचता यावे या साठी संवाद-वाचन खूपच उपयुक्त ठरते
या व्हिडिओवरून एक बाब नक्कीच लक्षात येते की संवादवाचनासारख्या उपक्रमातून मुलांना ओघवते आणि भावभावनांसहित वाचायला बरीच मदत मिळते. आता हे लहान लहान संवाद वाचून झाल्यावर पुढचे लक्ष्य एखादे लहानसे नाटुकले लिहून मुलांना त्याचे प्रकटवाचन करायला देणे हे ठरवले आहे. या सगळ्यातून मुलांची वाचनाची गती जरा वाढली की इतर लेखन प्रकार वाचण्याकडे वळायचे असे सध्याचे नियोजन आहे. पाहू या कसे जमते ते.
परवा भट्टीवरून निघताना एक हृद्य गोष्ट घडली. काम उरकून आम्ही सगळे गाडीत बसत होतो. इतक्यात अश्विनी नावाची एक मुलगी हाका मारत धावत धावत गाडीपाशी आली. तिने गाडीच्या खिडकीतून एक चिठ्ठी माझ्या हातात दिली आणि म्हणाली ‘घरां जान वाच.’ आणि ती आली तशी पळत पळत खेळायला निघून गेली. दुसरीतल्या अश्विनीला अजून नीटसे लिहिता येत नाही. पण ती भट्टीवरच्या आमच्या कार्यक्रमात बरीच नियमितपणे येते. तिने काय लिहिले आहे याची मला उत्सुकता होती.
भेट …
अश्विनीला काय म्हणायचे आहे हे तिच्याबरोबर रोज काम न करणाऱ्या व्यक्तीला कदाचित कळणार नाही. पण मला आणि किशोरला तिचे म्हणणे अगदी पहिल्या वाचण्यात लक्षात आले.
सर थॅंक यू. तुम्ही आमच्यासाठी
खूप करता. पण
आम्ही तुमच्यासाठी
काहीच करत
नाही. फक्त
अभ्यास दाखवतो. पण असं नाही.
मी तुमच्यासाठी बघा काय केले
आहे. थॅंक यू
सर.
धन्यवाद.
सगळ्या सरांचे आभार
मानते.
आमच्यासाठी काही
नाही.
या पत्राच्या शेवटी काढलेले फूल, झाडे आणि पत्राभोवतीची फुलांची नक्षी ही अश्विनीकडून आम्हाला मिळालेली भेट होती. आम्ही तिच्यासाठी खूप काहीतरी करतो म्हणून तिने आमच्यासाठी केलेले काहीतरी!
अश्विनीची अभिव्यक्ती प्रमाण भाषेतील नाही. तिची वाक्यरचना विस्कळीत आहे. जसे मनात विचार आले तसे ते कागदावर उतरवायचा प्रयत्न तिने केला आहे. लिखाणाचे फारसे नियोजन केलेले नाही. पण म्हणून काय झाले? आपल्या भावना लिहून दुसऱ्यापर्यंत पोहचवता येतात हे तिला नेमके उमगले आहे. सरांसाठी काहीतर करायची तिची भावना अगदी अस्सल आहे. अशावेळी तिच्या लिखाणातल्या चुका काढत बसणे अगदी करंटेपणाचे ठरेल.
अश्विनीचे आई-वडील उत्तर प्रदेशातले. ते म्हशी राखतात. त्यांचा तबेला भट्टीला अगदी लागून आहे. अश्विनी आणि तिच्या चार बहिणी भट्टीवरच्या मुलांसोबतच वाढतात. जून महिन्यात अश्विनी किशोरच्या वर्गात आली तेव्हा तिला १० पर्यंतच्या मोजणीशिवाय काही येत नव्हते. अश्विनीचे लिखाण वाचून मला अगदी भरून आले. तिचे पत्र वाचून, मी आणि किशोरने आरंभलेला खडकावर पेरणी करण्याचा उद्योग अगदीच निरर्थक नाही, याची खात्री आम्हाला पटली. अनेकांनी आमच्या या खटाटोपातून काय साध्य होणार असे स्पष्टच विचारले देखील. या उपक्रमाचे भवितव्य काय अशी रास्त चिंताही काही जणांना सतावते आहे. माझ्या मनात आले, अशा विचारी जगाला काय म्हणायचे असेल ते म्हणो. पण या मुलांसाठी इथे येत राहिले पाहिजे. नाही, मुलांसाठी नाही, तर स्वतःसाठी. असे आनंदाचे क्षण वेचण्यासाठी.
Counting
bricks is an important activity during our sessions at the brick kiln. The
children have made much progress in learning mathematics due to this activity.
Their parents have to count bricks to keep track of their payment. Hence,
counting bricks is a meaningful task for these children. Also, they don’t have
to sit at one place to complete this task. They have to move and run around,
which is akin to their basic nature. All of them are always ready to count
bricks. Whenever I realize that they are getting bored of sitting at one place
and reading, I ask them, “Shall we count bricks?” and a sudden wave of
enthusiasm engulfs them!
In the
beginning, they would count the bricks one by one. But now, they can count in
multiples of two, four, twenty five and hundred. The reason is, one ghoda
(stack of bricks at the kiln) is of 25 bricks. They stack up 12 layers of 2
bricks each, and keep a single brick on top. The children can count the bricks
in such a ghoda in twos. Bigger
stacks of 55 bricks are structured as follows: 13 layers of 4 bricks each, and
3 single bricks on top. The children make use of these structures for counting.
They also use their own strategies for counting. See this video, in which Rahul
is answering the question – “how many total bricks in 3 ghodas of 55
bricks each?”
how many total bricks in 3 ghodas of 55 bricks each?
Kishor and I
decided to push the children a little more. Our friend Arun had accompanied us
today to see our class. He is a teacher himself. He joined us in teaching and
took detailed notes of our efforts. There were many ghodas of raw bricks
outside Amit’s house. We started our math class over there. Rahul also came
with Amit. Our conversation went like this:
I: How many bricks in one ghoda?
Amit: Twenty five
I: So, how many bricks in these 2 ghodas?
Amit spent a
lot of time mumbling to himself and using his fingers to count. Arun’s patience
ran out and he prodded Amit.
Arun: How many bricks in the ghoda on this side?
Amit: Twenty five
Arun: Then say quickly how many bricks in two ghodas.
Amit started
counting bricks one by one. Now Arun couldn’t hold back himself. He explained
to Amit that if he counted in fours, he would be able to count faster. Amit
followed this, and counted 50 bricks. I smiled at Arun. He realized that he
needn’t have rushed Amit this way. He could have allowed Amit to count one by
one, and then brought it to his attention that he could count in fours to save
time. We realized that the principle of not interfering with children’s thought
processes sounds quite simple, but is actually quite difficult in practice. I
took over the conversation from this point onwards.
I: If there are 50 bricks in two ghodas, how many bricks in four ghodas?
Amit: A hundred (This reply came rather promptly)
I: How many bricks in this entire haaroli? (Haaroli is a long row of ghodas)
This was my
attempt to push Rahul and Amit. They started counting the ghodas by touching
each ghoda. “A hundred and hundred makes two hundred… another hundred makes
three hundred…”. But they would miss a ghoda in between or count a ghoda
twice. When they’d realize their mistake, they would start counting from
scratch. I suggested a trick – when they complete counting 100 bricks, they
should put a blade of grass on that ghoda. This trick worked very well,
and Amit and Rahul started moving forward.
After some
time, Rahul said, “Ten hundred”. Arun didn’t like that. He asked, “How much is ten
hundred?” Rahul got a little confused. I intervened and asked him to continue
counting. Arun realized that it’s not necessary to insist on using the word
‘hazaar’ – it can hinder the children’s process. The children completed
counting till “Twelve hundred bricks”. I decided to challenge them further.
How many bricks are there in all these haarolis?
I asked
them, “Can you tell me how many bricks are there in all these haarolis?”
Promptly, the boys climbed to the top of the haaroli and started
counting. Now, they were using many different strategies for counting. For
example, when they had to add 3600 and 1200, Amit said, “Thirty six hundred
plus twelve hundred, right? So, thirty six hundred and ten hundred…. that’s
forty six hundred… add the remaining two
hundred… that makes…. forty eight hundred!!” Using such strategies, they
counted “Eighty four hundred bricks in seven haarolis” and climbed down.
I decided to
represent this count in the form of a table. But we didn’t have a paper and
pen, so we squatted next to the haaroli and prepared a table on the sand, with
the help of the boys. While preparing the table, the boys were counting
mentally, and at times they were looking at the bricks and counting physically.
They went through the whole process of counting once again, albeit quite
quickly.
How many haarolis? How many bricks?
We have
noticed while working with these children that they face a problem with
number-names. In Marathi and some North Indian languages, the number-names are
a little peculiar. These children can
say “80 and 4” quite easily. But they find ‘chauryanshi’ (चौंऱ्यांशी ) confusing.
Actually, we can express ‘chauryanshi’as ‘ainshi chaar’ or ‘panchahattar’ as
‘sattar paach’. But this practice is not prevalent in Marathi. Rahul and Amit
can count “Eighty four hundred bricks in seven haarolis” but get
confused with number-names upto 100.
Prof.
Manohar Railkar has written a detailed article about this issue. The influence
of Sanskrit on Marathi and North Indian languages has resulted in making the
number-names upto 100 quite complicated. Children who come from families where
there is a regular practice of using numbers and learning tables by heart, may
not find it very problematic. But we will have to work quite hard to help our
brick kiln children master these number-names. However, if we look back at
where we had started from, it seems that we have made quite a lot of progress.
Kishor and I are feeling quite happy about it!
We do not have a fixed space for our
study sessions at the brick kiln. Sometimes, we assemble near the clay pit,
sometimes near the haaroli of bricks and sometimes where the children
are playing. The children don’t seem to have any problem with this, but I
started feeling the need for some stability. Radhi had made space for us
outside her bhonga, but recently, a new kiln was built next to her bhonga.
Women with head loads of raw bricks started walking through the courtyard to
the new kiln. Their ‘traffic’ started disturbing the progress of our sessions.
As it is, the children on the brick kilns are not used to sitting in one place
to concentrate on something. They started getting distracted by the movement
and casual conversations of these women. To find a new space for our ‘class’ –
that was the new challenge!
Another problem was that of our
students missing classes for babysitting. Kishor told me that Manali who was
studying in Grade 2, stopped attending school because her brother was born and
she had to stay at home to look after him. This is a common occurrence at the
brick kiln – children who are 8-10 years old have to remain at home to look
after their younger siblings. Such children are called baalghe. Families
that work on the brick kiln have no other option but to take the help of their
children for such things. Children help with household chores such as filling
up water, washing clothes, cooking etc. They also help with less strenuous work
at the brick kiln, such as sieving powdered bricks, setting up a haaroli
of bricks etc. But working as baalghe (babysitters) ties them down for
the whole day. They have to ignore their own childhood and share the
responsibility of their parents’ household. Kishor has permitted these children
to come to the school with their little siblings. Some of the enthusiastic
students do come to school holding their baby brother or sister in their arms.
But everyone doesn’t have this enthusiasm. It is little wonder that this brings
an end to their education.
Many such baalghe children
come to our class at the brick kiln. They bring their little siblings with
them. The other day, eight-year-old Avinash was drawing a picture based on a
story which we had shared in the class. Suddenly, his mother appeared with a
head load of bricks and a cane in her hand. She shouted at him and hit him hard
on the back with the cane. Before we could realize what was happening, Avinash
went running to his bhonga. His baby sister Durga was inside, in the
cradle, crying. Avinash was supposed to look after her. While she was crying,
he was busy drawing. That’s why he had received a beating. Before I could say
something to his mother, she was gone.
What could I have told her, anyway?
At the most I would have advised her not to beat him. But given their
situation, I wonder whether she would have listened to me at all. I sighed and
resumed teaching. Avinash returned to the class, carrying little Durga in his
arms. He held her in his lap and tried to go back to his drawing.
New Bhonga for the class
Kishor and I realized that we had to
work on this issue of babysitting, if we wanted to continue our classes.
Children missing school for babysitting has been noted as an issue for many
years. Educationists Tarabai Modak and Anutai Wagh had devised a very useful
strategy to handle this problem. They used to run a crèche, a pre-school centre
and a few primary school grades together under one roof. They named it ‘Vikas
Wadi’. All the children would get looked after in this system. Parents could
leave their children there and go to work without any worries. We decided to
use this time-tested strategy for our students. We decided to run a crèche, at
least till the time our classes will be on at the brick kiln. Kishor asked a
local girl named Ankita if she would do this work, and she agreed readily.
But where would this crèche be? We
needed a proper space for it. Kishor appealed to the parents – would they
please build a bhonga for us? They proposed to build a bhonga on
their next pay day or holiday. Sure enough, on the pay day, Umesh’s father took
his tractor to the forest to bring grass and sticks; but no one offered to
help. He returned with some kasaad grass. When Kishor asked the parents
about it, they said, they were unable to go. Then, Gurya’s father said, he had
a bhonga near the road which was lying unused, and he wouldn’t mind
letting us use it. Kishor seized the opportunity, and set the ball in motion
for repairing the old bhonga.
The children’s enthusiasm for preparing this space was amazing! They brought kasaad grass and covered the bhonga, they levelled the floor of bhonga and prepared the courtyard for our classes by covering the ground with cow dung. Kishor brought some old sarees, which were tied along the fence. Our new ‘classroom’ was taking shape! Inside the bhonga, we tied a saree between two poles, and created a cradle for small babies. We brought a bagful of toys and teaching aids for pre-schoolers. On one wall, we hung a mirror, and kept a comb, face powder and hair oil next to it. Outside, we put a bucket of water to wash hands and feet. All the facilities were in place. We tied a rope outside the bhonga and put storybooks on it – our ‘hanging library’! Our brick kiln children who came to the class started washing their faces, applying hair oil and face powder…. All of them looked like salted peanuts!!
The crèche created a good space for
our brick kiln classes. The younger children started playing with Ankita. The
babies were put in the cradles. And the older children started sitting with us
in the courtyard to study. But…. Just when I was finding a semblance of
stability…. The other day some stray dogs tore off the sarees which were tied
along the fence. The children made ropes with those tattered sarees and built
swings! With the fence gone, the courtyard soon became a dumping ground for
garbage.
There we go again. Start from scratch. Tarabai and Anutai had done this pioneering work decades ago. I feel amazed and saddened that their work is not outdated even today.
विटा मोजणे हा आमच्या भट्टीवरील वर्गातील महत्त्वाचा उपक्रम आहे. या एकाच उपक्रमाच्या आधारे मुलांनी गणितात बरीच प्रगती केली आहे. मजुरीचा हिशेब ठेवण्यासाठी मुलांच्या पालकांना विटा मोजाव्याच लागतात. म्हणूनच विटा मोजणे हे या मुलांसाठी अत्यंत अर्थपूर्ण काम आहे. दुसरी एक बाब म्हणजे विटा मोजण्यासाठी एका जागी बसायची गरज नसते. इकडे तिकडे फिरून, धावत पळत हे काम करायचे असते म्हणून ते या मुलांच्या सहज वृत्तीला चांगले मानवते. त्यामुळे विटा मोजण्यासाठी सगळ्यांचीच तयारी असते. जरा बसून, पुस्तक वगैरे वाचून कंटाळा आलाय असे लक्षात आले की मी, “विटा मोजू या का?” असे विचारतो आणि मग सगळ्यांमध्ये एकदम उत्साह संचारतो.
सुरुवातीला विटा मोजताना मुले अगदी एकेक वीट मोजायची. आता मात्र दोनाच्या, चाराच्या , पंचवीसच्या आणि शंभराच्या टप्प्यांनी मोजण्यावर मुलांनी चांगलेच प्रभुत्त्व मिळवले आहे. यालाही एक कारण आहे. २५ विटांचा एक घोडा असतो. या घोड्यात दोनाचे बारा थर आणि वर एक वीट अशी रचना असते. या घोड्यातील विटा आता मुले २ च्या टप्प्यात मोजतात. ५५ विटांच्या घोड्यात ४ विटांचा एक थर असे १३ थर आणि वर ३ विटा अशी रचना असते. या रचनांचा आधार घेऊन मुले मोजणी करतात. मोजणी करताना ते आपापले डावपेचही वापरतात. ५५ विटांच्या तीन घोड्यांत एकूण किती विटा असतील याचे उत्तर राहुलने कसे दिले आहे ते पाहा.
एका घोड्यात ५५ विटा आहेत तर अशा ३ घोड्यांत किती विटा बसतील ?
आता मुलांना अजून थोडे पुढे न्यावे असे मी आणि किशोरने ठरवले. आज भट्टीवरील आमचा वर्ग पाहायला आमचा मित्र अरुण आला होता. तो स्वतःही शिक्षकच आहे. त्यामुळे तोही शिकवण्यात सहभागी झाला. त्याने आमच्या या प्रयत्नांच्या सविस्तर नोंदीही घेतल्या. अमितच्या घरासमोर कच्च्या विटांचे घोडे रचलेले होते. या घोड्यांसोबत आमचा आमचा गणिताचा तास सुरू झाला. अमितचा सोबती राहुलही त्याच्याबरोबर आला. त्यांच्यात आणि माझ्यात झालेला संवाद काहीसा असा:
मी : एका घोड्यात किती विटा?’
अमित : पंचवीस.
मी : मग या दोन घोड्यांत किती विटा?
यावर अमित बराच वेळ विचार करत होता काहीतरी पुटपुटत बोटांची हालचाल करत होता. शेवटी अरुणचा पेशन्स संपला आणि त्याने न रहावून अमितला मध्येच टोकले.
अरुण : या बाजूच्या घोडीत किती विटा रे?
अमित : पंचवीस
अरुण : मग आता सांग ना या दोन घोड्यात किती विटा ते ?
अरुणने असे म्हणताच अमितने एक एक वीट मोजायला सुरुवात केली. आता अरुणला अगदीच राहावेना. त्याने अमितच्या लक्षात आणून दिले की 4 च्या टप्प्याने मोजले तर विटा पटकन मोजून होतील. अमितनेही तसे करून 50 विटा मोजल्या. मी हसून अरुणकडे पाहिले. त्याला जाणवले की अशी घाई करायची काही गरज नव्हती. अमितला एकेक करून विटा मोजून दिल्या असत्या व नंतर चारच्या टप्प्यातील मोजणीने काम कसे पटकन होते हे सांगितले असते तरी चालले असते. मुलांच्या विचार प्रक्रियेत शक्यतो अडथळा आणायचा नाही हे ऐकायला साधे वाटणारे तत्त्व शिक्षक म्हणून काम करताना पाळणे किती अवघड बनते हे आम्हा सर्वांनाच जाणवले. मग पुढील संवादाची सूत्रे मी माझ्या हातात घेतली.
मी : दोन घोड्यात 50 विटा तर मग या चार घोड्यात किती असतील?
अमित : शंभर (हे मात्र त्याने चटकन सांगितले)
मी : मग या पूर्ण हारोलीत किती विटा असतील रे? (‘हारोली’ म्हणजे विटांच्या घोड्यांची रांग), मी राहुल आणि अमित यांना पुढे खेचायचे ठरवले.
आता दोघांनी मिळून विटांच्या घोड्यांना हात लावत मोजायला सुरुवात केली. ‘शंभर न शंभर मिलून दोनशे न शंभर मिलून तीनशे…..’ अशी त्यांची मोजणी सुरू झाली. पण मधेच एखादा घोडा मोजायला विसरायचे किंवा एकच घोडा दोनदा मोजायचे. चूक झालेली कळली की मग परत पहिल्यापासून मोजणी सुरू करायचे. त्यांची ही धडपड पाहून मी एक युक्ती सुचवली. 100 विटा मोजून झाल्या की त्या घोड्याला एक काडीचा तुकडा लावायचा. ही युक्ती चांगलीच कामी आली आणि अमित व राहुल भराभर विटा मोजायला लागले.
मोजता मोजता राहुल म्हणाला, ‘दहाशे’. अरुणला त्याचे दहाशे म्हणणे जरा खटकले. त्याने विचारले, “दहाशे म्हणजे किती?” यावर राहुल जरा गोंधळला. मी मध्ये पडून त्याला मोजणी पुढे चालू ठेवायला सांगितली. अरुणच्याही लक्षात आले की हजारच म्हटले पाहिजे हा आग्रह इथे कामाचा नाही; त्याने मुलांच्या मोजणीत व्यत्यय येऊ शकतो. मुलांचे एका हारोलीत ‘बाराशे विटा’ इथपर्यंत मोजून झाले. आता मी त्यांना पुढचे आव्हान द्यायचे ठरवले.
या सर्व हारोल्यांत किती विटा असतील ?
मी विचारले, “आता मला सांगा ह्या सगळ्या हारोलीत किती विटा असतील?” मी हा प्रश्न विचारताच दोघेही त्या विटांच्या घोड्यावर चढून बसले आणि मोजू लागले. आता विटा मोजताना मात्र दोघांनीही बरेच डावपेच वापरले. उदाहरणार्थ ३६०० विटांत १२०० विटा मिळवायची वेळ आली तेव्हा अमित म्हणाला,
“छत्तीसशे ना बाराशे मिलवायचे ना? मग छत्तीसशे ना दहाशे झाले…… शेचालीसशे आनि दोनशे मिलवंल का झाले अठ्ठेचालीसशे !” हे आणि असे बरेच डावपेच वापरून दोघेही ‘सात हारोलीत चौऱ्याऐंशीशे विटा’ इथपर्यंत पोचले व खाली उतरले.
आता मी ही सगळी मोजणी एका तक्त्याच्या रूपात त्यांच्यासमोर मांडायचे ठरवले. हाताशी लिहायला काही नव्हते म्हणून तिथेच धुळीवर हारोल्यांची संख्या आणि त्यांच्यातल्या विटांची संख्या यांचा एक तक्ता मुलांच्या मदतीने बनवला. तक्ता बनवाताना कधी दोघे मनातल्या मनात हिशेब करून उत्तर देत होते तर कधी उठून प्रत्यक्ष हारोल्यांकडे बघत आकडेमोड करत होते. हा तक्ता बनवताना ते मूळ मोजणीच्या प्रक्रियेतून पुन्हा एकदा गेले. पण या वेळी बऱ्याच वेगाने.
किती हारोल्या ? किती विटा ?
या मुलांसोबत काम करताना जाणवलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना जाणवणारी संख्यानामांची अडचण. मराठी आणि बऱ्याच उत्तर भारतीय भाषांत संख्यानामे थोडी विचित्र आहेत. या मुलांना ८० नी ४ असे सांगणे सहज जमते. मात्र चौंऱ्यांशी असे संख्यानाम विचारले की गोंधळायला होते. खरे तर आपण चौऱ्यांशी ला ऐंशीचार किंवा पंचाहत्तरला सत्तरपाच अशी नावे देऊ शकतो. पण तसे संकेत मराठीत रूढ नाहीत हा प्रश्न आहे. सात हारोल्यांत ८४०० विटा आहेत हे मोजणारे राहुल आणि अमित १०० पर्यंतच्या संख्यानामांत मात्र अजूनही घोटाळे करतात.
प्राध्यापक मनोहर राईलकर यांनी या बाबत एक सविस्तर लेख लिहिला आहे. मराठी व एकूणच उत्तर भारतातील भाषांवरील संस्कृतच्या प्रभावामुळे १०० पर्यंतच्या संख्यांची नावे किचकट झाली आहेत. ज्या घरांमध्ये पाठांतराची, दैनंदिन जीवनात संख्यावापराची परंपरा असते अशा मुलांना ही अडचण विशेष जाणवत नाही. मात्र भट्टीवरच्या आमच्या मुलांनी यावर प्रावीण्य मिळवावे म्हणून आम्हाला बरीच मेहनत करावी लागणार असे दिसते आहे. पण आम्ही जिथून सुरुवात केली होती ते लक्षात घेता बरीच मजल मारली आहे असे म्हणायला हरकत नाही. ही प्रगती मला आणि किशोरला सुखावणारी आहे हे निश्चित.
भट्टीवरचा आमचा वर्ग एका जागी चालत नाही. कधी चिखलाच्या खड्ड्यापाशी, तर कधी विटांच्या हारोलीपाशी, तर कधी मुलांचा खेळ चालू असेल तिथे अशी भटकंती चालू असते. मुलांना त्यात काही अडचण नाही, पण मला मात्र आता जरा स्थैर्य यायला हवे असे वाटू लागले होते. तशी राधीच्या अंगणात बसायला जागा होती. पण तिच्या भोंग्याच्या बाजूला नवी वीट भट्टी रचायला सुरुवात झाली. डोक्यावर मापांची (कच्च्या विटांची) चवड घेऊन बाया आता अंगणातून ये-जा करू लागल्या. या ‘मापा टाकणाऱ्या’ बायांचा आमच्या वर्गाला बराच त्रास होऊ लागला. एक तर एका जागी बसून लक्ष एकाग्र कारायची या मुलांना फारशी सवय नाही. त्यात आता येता जाता बाया काही बाही बोलत गेल्या की मुलांचे लक्ष फारच विचलित होई. त्यामुळेआता वर्ग कुठे घ्यायचा हा नवा प्रश्न समोर येऊन ठाकला.
दुसरी अडचण म्हणजे मुले बालघे राहण्याची. किशोरने मला परवा सांगितले की दुसरीतली मनाली आता शाळेत यायची बंद झाली. कारण तिला भाऊ झाला आणि ती बालघी राहू लागली. भट्टीवरल्या प्रतिकूल परिस्थितीत साधारण आठ दहा वर्षांच्या मुलांवर त्यांच्या लहान भावंडाना सांभाळायची जबाबदारी पडते. अशा लहान मुलांना सांभाळण्यासाठी घरी राहणाऱ्या मुलांना बालघे म्हटले जाते. भट्टीवर येऊन काम करणाऱ्या कुटुंबाना अनेक कामांत अशी मुलांची मदत घेतल्याशिवाय जगणेच शक्य होत नाही. पाणी भरणे, कपडे धुणे, कधीमधी रांधणे यासारखी कामे मुले सहजच करत असतात. शिवाय भट्टीवर पिठा चाळणे, हारोली रचणे असल्या कामांतही मुलांना मदत करावी लागते. पण बालघे राहणे मात्र त्यांना दिवसभरासाठी बांधून टाकते. स्वतःच्या बालपणाकडे दुर्लक्ष करून त्यांना आपल्या पालकांच्याच संसाराची जबाबदारी ओढावी लागते. तशी किशोरच्या शाळेने या मुलांना आपल्या लहान भावंडांसह शाळेत येऊन बसायची परवानगी दिली आहे. जरा हिंडती फिरती झालेली मुले कडेवर घेऊन काही जण उत्साहाने शाळेत येतात. पण हा उत्साह सगळ्यांनाच नसतो. अशा परिस्थितीत त्यांचे शिक्षण न थांबले तरच नवल.
भट्टीवरच्या आमच्या वर्गात अशी अनेक बालघी राहणारी मुले त्यांच्या लहान भावंडाना कडेवर घेऊन येतात.परवा सात आठ वर्षांचा अविनाश ऐकलेल्या गोष्टीचे चित्र काढत बसला होता. त्याची आई डोक्यावर मापांची चळत आणि हातात एक दांडका घेऊन अचानक आली. तिने तारस्वरात किंचाळत त्याच्या पाठीवर दांडक्याने एक रट्टा हाणला. काय घडते आहे हे कळायच्या आत अविनाश त्याच्या भोंग्याकडे पळाला. अविनाशची लहान बहीण दुर्गा भोंग्यातल्या झोळीत रडत होती. तिला सांभाळायची जबाबदारी अविनाशची. ती रडते आहे आणि हा इथे खुशाल चित्र काढत बसलाय यासाठी त्याला हा रट्टा मिळाला होता. मला सगळे समजून मी काहीतरी बोलायच्या आत अविनाशची आई निघूनही गेली होती.
तसेही मी काय सांगणार होतो तिला? फार तर मारू नका वगैरे उपदेश केला असता, पण त्या परिस्थितीत असले काही अविनाशच्या आईने किती ऐकले असते कोण जाणे. मी एक उसासा टाकून परत शिकवायला सुरुवात केली. तेवढ्यात अविनाश दुर्गाला कडेवर घेऊन आला आणि तिला मांडीवर खेळवत परत चित्र काढायचा प्रयत्न करू लागला.
भट्टीवरल्या वर्गाचा नवा भोंगा
आता या बालघ्यांसाठी काहीतरी केल्याशिवाय पुढची मजल गाठणे कठीण आहे यावर किशोर आणि माझे एकमत झाले. मुलांचे बालघे राहणे आणि त्यांची शाळा तुटणे ही तशी फार जुनी समस्या आहे. शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी यावर एक नामी उपाय काढला होता. त्या आदिवासी मुलांसाठी पाळणाघर, बालवाडी व प्राथमिक शाळेचे काही वर्ग एकत्र चालवत. या विकासवाडीत मग सगळ्याच मुलांची सोय होई. मुलांच्या पालकांनाही बिनघोर कामाला जाता येई. बालघ्यांच्या समस्येवर आम्ही मग हाच काळाच्या कसोटीवर उतरलेला उपाय करायचे ठरवले. निदान भट्टीवरचा वर्ग चालू असेपर्यंत तरी या लहान मुलांचे पाळणाघर चालवावे असे ठरवले. गावतल्याच अंकिता नावाच्या मुलीला किशोरने या कामासाठी विचारले आणि ती तयारही झाली.
पण पाळणाघर चालवायचे कोठे? त्यासाठी स्वतंत्र जागा हवी. किशोरने मग पालकांना विचारले की आम्हाला बसायला एक भोंगा बांधून द्याल का? खर्चीच्या दिवशी नायतर सणाच्या दिवशी भोंगा बांधू या असा प्रस्ताव पुढे आला. पुढच्या खर्चीला भोंगा बांधायचे ठरले. खर्चीच्या दिवशी उम्याचा बाबा ट्रॅक्टर घेऊन रानातून कसाड गवत आणि काठ्या आणायला गेला खरा, पण त्याच्या मदतीला कोणीच गेले नाही. थोडे फार कसाड गवत घेऊन तो परत आला. किशोरने या बाबत पालकांकडे चौकशी केली. तर त्यांचे म्हणणे नाही जमले आम्हाला जायला. आता काय करायचे या बाबत चर्चा सुरू असताना गुऱ्याचा बाबा म्हणाला की, रस्त्याच्या बाजूला माझा एक भोंगा आहे तो घ्या तुम्ही वापरायला – मी तो फारसा वापरत नाही. पडत्या फळाची आज्ञा घेऊन किशोरने तो भोंगा दुरुस्त करायला घेतला.
या कामी मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. त्यांनी भोंग्यावर कसाड गवत टाकले. जमीन माती टाकून चोपली, बाहेर बसायचे अंगण शेणाने सारवून तयार केले. किशोरने जुन्या साड्या आणून दिल्या होत्या त्याचे अंगणाला कुंपण घातले. आणि आमच्या वर्गाची नवी जागा तयार होऊ लागली. या भोंग्याच्या आत अगदी लहान बाळांसाठी झोळी बांधली. एका ट्रंकेत बालवाडीच्या मुलांना खेळता येतील अशी साधने आणून ठेवली. भोंग्याच्या आत आरसा, कंगवा, तेल, पावडर, बाहेर हात पाय धुवायला पाण्याची बादली अशा सगळ्या व्यवस्था लागल्या. भोंग्यांच्या बाहेर एक दोरी लावली आणि त्यावर वाचनालय सुरू झाले. भट्टीवरील मुले आता डोक्यावर तेल थापून तोंडाला पावडर फासून खाऱ्या शेंगदाण्यासारखी दिसू लागली.
तेल ,पावडर आमच्यासाठी तान्ह्यांची सोय झोळीत …
या पाळणाघरामुळे आमच्या भट्टीवरल्या वर्गाला बरेच रूप आले. लहान मुले अंकितासोबत खेळू लागली. तान्ह्यांची भोंग्यातल्या झोळीत सोय झाली. आणि मोठी आमच्यासोबत भोंग्याच्या अंगणात बसून शिकायला मोकळी झाली. सारे काही स्थिरावते आहे असे वाटत असतानाच परवा एक गंमत झाली. भट्टीवरच्या मोकाट कुत्र्यांनी आमच्या वर्गाच्या अंगणाला लावलेले साड्यांचे कुंपण फाडून टाकले. त्या फाटलेल्या साड्यांच्या दोऱ्या करून मुलांनी मग झोपाळे बांधले. जरा स्वच्छ राहणारे अंगण पुन्हा भट्टीवरच्या कचऱ्याने भरले. आता पुनश्च हरी ओम् ! ताराबाई आणि अनुताई यांनी अनेक दशकांपूर्वी केलेले काम अजूनही कालबाह्य होत नाही याचे मला नवलही वाटते आहे आणि वाईटही.
Today was the weekly
pay-day at the brick kiln. The workers had a day off. Most of the parents were
planning to go to the market after collecting their pay from the brick kiln
owner. When Kishor and I reached the brick kiln, there was silence all around.
We couldn’t see the children anywhere. We walked a little towards the back of
the brick kiln and saw Umesh and a couple of boys playing with marbles. Kishor
said, “Come on, let’s start our study session.”
All of them said,
“We won’t come today.”
“Why?” Kishor asked.
‘Today is pay-day,
right?” They replied.
Kishor tried very
hard to bring them around by telling them that I had travelled a long distance
specially to work with them. Plainly, they asked, “Why did you come today?”
Kishor’s efforts were in vein, and all the children continued playing and
ignored us completely.
We were both a
little angry and dejected after seeing this response from the children. Why did
we come here all the way, leaving our regular work and comforts? Only to be
asked “Why did you come today”? My ego was hurt. Kishor and I glanced at each
other and gulped down our mixed emotions.
There was really no
point in getting angry with the children. They had never asked us to come and
teach them. It was our need! It was also pointless to expect the parents or
children to inform us in advance that today was supposed to be their weekly
pay-day and it would be a day off at the brick kiln. We didn’t ask, so they
didn’t inform us. If we had asked, we would have saved ourselves a trip. We
stood there trying to look composed, watching the children’s game.
Umesh was hitting
the marbles with absolute precision. I was really impressed to see his skill.
He had a small box full of marbles. I asked him, “Where did you get all these
marbles from?” He said, “I won them!”
“How does one win
them?” I asked.
All of them
started sniggering. They were surprised
that I didn’t know such a simple thing.
“You don’t know how
to play?” asked Umesh.
Well. At least they
were now taking an interest in what I was saying!
“ Well, I really don’t know. Will you teach me?” I asked.
“Didn’t you play
with marbles as a child?” Umesh wanted to know.
I remembered my childhood. If I had even mentioned the name ‘marbles’, I would have been beaten up. All the adults around me had impressed upon me that marbles was a game ‘below our status’. They ensured that I never took any interest in it. I had totally missed this pleasure in life.
I insisted that
Umesh should teach me how to play, and he agreed. All the children were highly
excited by now. I didn’t have any marbles with me, so I borrowed two marbles
from one of the boys and started playing. It was mutually agreed beforehand
that even if I won or lost, the marbles would be returned to the original
owner. They taught me a game called ‘dhusha’. They laughed heartily at my poor
hits. After playing for a while, I asked them a question: Suppose, I have 14
marbles, and I want to share them equally among Amit, Umesh, Mangya and Gurya.
How many marbles will each one get?
They halted their
game, took 14 marbles from the box, and started dividing. It seemed that they
were enjoying this new activity! Soon, I had succeeded in giving them 3-4
problems of multiplication and division. It wasn’t a wasted trip, after all!
If 14 marbles are shared equally among four children, how many marbles will each one get?
I was rather pleased at my clever trick of converting a game of marbles into solving math problems. But the children didn’t let me enjoy my new-found happiness. The next day, the children had brought berries. Based on yesterday’s experience of creating math problems with marbles, I started giving them division problems using berries. But after dividing berries equally, one of the children happily popped a berry in his mouth. The one who had brought the berries got angry at this and punched him hard. Both Kishor and I had a tough time to stop the wild fight that ensued. The ‘clever trick’ of using berries for math problems hadn’t worked, and yesterday’s success turned into a failure today.
When we had cleared
the air among the boys who were fighting, I noticed that Umesh was missing. I
asked the children about him. They informed me that his family had left the
brick kiln, because his father fought with the owner. No one could tell us
where they had gone.
Suddenly, I felt
quite depressed. Could Kishor or I really achieve anything in this highly
unstable environment, by coming here to teach for a few days? Would these
children – for whom we are taking all the efforts – really benefit at all? Is
our work providing an answer to these children’s problems?
On our way back from
the brick kiln, I asked Kishor, “Is our work really going to yield anything?”
“I don’t know. But
let’s keep at it. Something may happen.” said Kishor, who has been brought up
in a non-insistent culture.
Slowly, I could feel my depression fade away. A new thought emerged – our work is actually teaching us the full meaning of ‘nishkaam karmayog’ –one the central messages of the Bhagvad Geeta – to continue doing your work without expecting any rewards. Such opportunities are quite rare. I smiled at Kishor, and started planning the next day’s session with him.
आज खर्चीचा ( आठवडी पगाराचा) दिवस होता. त्यामुळे कामाला सुट्टी होती. मालकाकडून पैसे घेऊन बरेच पालक आज बाजारात जाणार होते. मी आणि किशोर भट्टीवर पोहचलो तर सगळीकडे सामसूम होती. मुलेही कुठे दिसेनात. म्हणून शोधत शोधत दोघेही जरा भट्टीच्या मागच्या बाजूला गेलो तर तिथे उमेश गोट्या खेळताना दिसला. किशोर त्यांना म्हणाला, “चला.”
तर
सगळे म्हणाले “आज नय इयाचु आमी”
किशोर
म्हणाला,” का रे ?”
” आज तं खर्ची ना ?
” सगळ्यानी उत्तर दिले.
किशोरने सगळ्यांना बोलावायचा बराच प्रयत्न केला. मी आणि तो मुद्दाम त्यांना शिकवायला इतक्या लांबून आलो आहे असे सांगितले. तर सगळे म्हणाले, “आज कशा आलास?” किशोरच्या वाटाघाटींना काही यश येईना. सगळेजण आमच्याकडे साफ दुर्लक्ष करून खेळत बसले.
मुलांचे हे वागणे पाहून आम्हा दोघांनाही राग आला आणि जरा वाईटही वाटले. सगळे काम धाम सोडून यांना शिकवायला म्हणून इथे यायचं आणि वरून ‘कशाला आलास’ हे ऐकून घ्यायचं? माझा इगो तर चांगलाच दुखावला होता. आम्ही काही न बोलता एकमेकांकडे पाहिले आणि आलेला राग मनातल्या मनात गिळला.
तसंही रागावून काय फायदा? मुलांनी थोडंच आम्हाला येऊन शिकवा असे म्हटले होते? हौस आमचीच! शिवाय उद्या खर्ची आहे, आमची सुट्टी असते, येऊ नका, असे सांगण्याची अपेक्षा मुलांकडून किंवा पालकांकडून करणे व्यर्थच होते. खरे तर आम्ही विचारले नाही, म्हणून त्यांनी सांगितले नाही! विचारले असते तर खेप वाचली असती कदाचित. असे म्हणून आम्ही दोघेही जमेल तितक्या शांतपणे मुलांचा खेळ पाहत उभे राहिलो.
उम्या भराभर गोट्या टिपत होता. त्याचा नेम पाहून मी चकित झालो. त्याच्याकडे चांगल्या अर्धा डबा भरून गोट्या होत्या. मी त्याला विचारले, “कुठून आणल्यास?” तर म्हणाला, ‘मीह्यान जिकल्या.’
“कशा जिकायच्या रे गोट्या ?” मी विचारले.
तशी सगळी फिदी फिदी हसू लागली. मला इतकी साधी गोष्ट माहीत नाही याचे त्यांना भारीच आश्चर्य वाटले.
” खेलता नाय ये तुला?” उम्याने विचारले.
चला. मगाशी आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून गोट्या खेळण्यात मग्न असलेल्या मुलांना मी काय बोलतोय यात रस वाटू लागला याचे मला बरे वाटले.
” मला नाही रे येत. तुम्ही शिकवाल का मला?” मी विचारले
“बारीक होतास तहां नाय खेललास?” उमेशने विचारले.
मला एकदम माझे लहानपण आठवले. मी नुसते गोट्या खेळायचे नाव जरी काढले असते तरी चांगली धुलाई झाली असती. खरे तर गोट्या हा कसा ‘निम्न दर्जाचा’ खेळ आहे हे माझ्या आसपासच्या लोकांनी आपल्या बोलण्यावागण्यातून मनावर इतके ठसवले होते की मी कधी त्या वाट्यालाच गेलो नाही. आयुष्यात हा आनंद घ्यायचा राहूनच गेला. मग मी उमेशकडे ‘गोट्या शिकव’ असा जरा हट्ट केला, तसा तो तयार झाला. मग सगळ्यांनाच भारी उत्साह आला. माझ्याकडे गोट्या नव्हत्या, त्यामुळे दोन गोट्या उसन्या घेऊन खेळायला सुरुवात केली. मी गोट्या जिंकल्या किंवा हरल्या तरी ज्याच्या त्यालाच परत द्यायच्या असे ठरले. मग मुलांनी मला ‘ढुशा’ नावाचा गोट्यांचा खेळ शिकवला. माझा अचाट नेम पाहून सगळे मनसोक्त हसले. थोडावेळ खेळून झाल्यावर मी त्यांना एक प्रश्न विचारला.
समजा माझ्याकडे १४ गोट्या आहेत आणि मला त्या मला अमित, उमेश, मंग्या आणि गुऱ्याला सारख्या वाटायच्या आहेत. तर प्रत्येकाला किती गोट्या मिळतील?
मुलांनी खेळ थांबवला ! गोट्यांचा डबा घेऊन त्यातून १४ गोट्या काढून वाटणी सुरू केली. एकूणच या नव्या खेळाची त्यांना बरीच मजा वाटत होती असे दिसले. मग एका मागोमाग एक गुणाकाराची आणि भागाकाराची तीन चार उदाहरणे मी गोट्यांचा आधार घेत पदरात पाडून घेतली. आजची खेप अगदीच वाया नाही गेली म्हणायची.
चौदा गोट्या चार मुलांना सारख्या वाटल्या तर प्रत्येकाला किती मिळतील ?
गोट्या खेळण्याच्या निमित्ताने पोरांकडून अभ्यास करून घेण्याच्या माझ्या चलाखीचे मलाच जरा कौतुक वाटले. पण हा आनंद मुलांनी फार काळ टिकू दिला नाही. दुसऱ्या दिवशी भट्टीवर गेलो असता मुलांच्या खिशात बोरे होती. कालचा गोट्यांचा अनुभव लक्षात घेऊन मी आज बोरे वाटण्याची उदाहरणे मुलांना सांगू लागलो. पण कसचं काय? बोरे वाटून झाल्यावर, उत्तर काय आहे हे सांगायच्या आतच कोणाला तरी वाटलेल्या बोरातले बोर खायची इच्छा झाली. त्याने सरळ वाटलेल्या बोरांपैकी एक बोर तोंडात टाकले. ते पाहताच ज्याची बोरे होती त्याने खाणाऱ्याच्या पाठीत एक गुद्दा हाणला. त्यावरून मुलांची जी जुंपली ती सोडवता सोडवता माझ्या आणि किशोरच्या नाकी नऊ आले. प्रत्यक्ष बोरे वापरून शिकवण्याचा आमचा प्रयत्न फसल्याने काल मोठ्या चलाखीने कामी लावलेला दिवस आज सपशेल वाया गेला.
मुलांची भांडणे सोडवून झाल्यावर माझ्या लक्षात आले की आज उमेश आलेला नाही. मी त्याच्याबद्दल मुलांकडे चौकशी केली तर कळले की त्याचे कुटुंब भट्टी सोडून निघून गेले. कारण काय, तर त्याच्या वडिलांचे शेटच्या सोबत भांडण झाले. कुठे गेले आहेत याची चौकशी केली तर काही पत्ता लागला नाही.
माझ्या मनात एकदम निराशा दाटली. इतक्या अस्थिर वातावरणात मी आणि किशोरने इथे येऊन शिकवण्याने काय साध्य होणार आहे? ज्या मुलांसाठी आम्ही हा खटाटोप मांडलाय त्यांना तरी याचा काय फायदा होणार आहे? आम्ही जे करतोय ते खरेच या मुलांच्या प्रश्नांचे उत्तर आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले.
भट्टीवरून परतताना मी किशोरला विचारले, ” आपल्या कामातून खरंच काही घडणार आहे का रे ?”
“माहिती नाही. पण करत राहू या. होईल
काहीतरी.” अनाग्रही संस्कृतीत
वाढलेल्या किशोरने सहज उत्तर दिले.
मग माझ्याही मनातली निराशा दूर झाली. डोक्यात विचार आला आमचे हे काम म्हणजे ‘निष्काम कर्मयोगाची मोफत शिकवणी’च नाहीय का? अशी संधी आयुष्यात परत परत येत नाही. मी हसलो आणि उद्या भट्टीवर काय करू या, याबद्दल किशोरशी बोलू लागलो.